टॅक्स मध्ये कुठलाही बदल नाही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून देण्यात आलेला नाही. यामध्ये नव्या टॅक्स रिजीम् नुसार 7 लाखापर्यंतच नागरिकांना कर द्यावा लागणार नाही.
लक्षद्वीप सह भारतीय बेटांचा विकास केला जाणार असल्याची माहिती अर्थमंत्री सीतारमण यांनी दिली आहे. पर्यटन विकासासाठी जलवाहातूकीला देखील चालना दिली जाणार आहे. देशातील पोर्ट्स कडे लक्ष दिले जाईल असं त्या म्हणाल्या आहेत.
तेलबियांबाबत देशाला आत्मनिर्भर करणार असल्याची माहिती निर्मला सीतारमण यांनी आजच्या बजेट मध्ये म्हटलं आहे. तेलासाठी इतर देशांवर अवलंबून राहण्याचं प्रमाण कमी केले जाईल यामध्ये तीळ, भूईमुगाचा सह सार्या तेलबियांचा समावेश असेल.
25 कोटी लोकांना गरिबीमधून बाहेर काढण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे. पंतप्रधान जनमन योजना मधून आदिवासी समाजाही विकास करण्यात आला. तसेच 4 कोटी शेतकर्यांना पिकविमा योजनेचा फायदा मिळाला. असेही त्या म्हणाला.
2047 पर्यंत भारत विकसित देश करणार असल्याचा विश्वास अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बोलून दाखवला आहे. पारदर्शकता आमच्या कामाचं हायालाईट आहे. आमच्या 10 वर्षांच्या कामातून आता आमच्यावर जनता पुन्हा विश्वास ठेवेल असेही त्या म्हणाल्या आहे. समाजातील कोणताही घटक मागे राहणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री Nirmala Sitharaman यांच्याकडून अंतरिम बजेट वाचनाला सुरूवात झाली आहे. हे मिनी बजेट आहे. लोकसभा निवडणूकीपूर्वी मोदी सरकार आता सामान्यांसाठी कोणकोणत्या घोषणा करणार याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.
अंतरिम बजेट ला राष्ट्रपती Droupadi Murmu यांची मंजुरी मिळाली आहे. आज राष्ट्रपती भवनामध्ये केंद्रीय अर्थमंत्री दोन्ही राज्यमंत्र्यांसह तसेच अन्य अधिकार्यांसोबत पोहचल्या. यावेळी राष्ट्रपतींनी निर्मला सीतारमण यांना भेटून शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी अर्थमंत्र्यांना दही-साखर देखील दिले. त्यांच्या या फोटोची सध्या सोशल मीडीया मध्ये चर्चा होत आहे.
अंतरिम बजेटच्या पार्श्वभूमीवर थोड्याच वेळात केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. सध्या राष्ट्रपतींकडून बजेटला मंजुरी घेण्यासाठी पोहचलेल्या निर्मला सीतारमण मंत्रिमंडळ बैठकीला पोहचतील आणि तेथेही या 'मिनी बजेट' ला मंजुरी दिली जाईल आणि नंतर अर्थमंत्री 11 वाजता बजेट सादर होईल.
आज अंतरिम बजेट सादर होणार आहे. या बजेटला मंजुरी घेण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण राष्ट्रपतींकडे गेल्या आहेत. तर दुसरीकडे बजेटची कागदपत्रं संसदेमध्ये आणण्यात आली आहेत. आता 11 वाजता बजेटचं वाचन सुरू होईल. अर्थमंत्री आता बजेट टॅब वरच वाचत असल्याने ही कागदपत्रं केवळ सादर केली जातात.
केंद्रीय अर्थमंत्री Nirmala Sitharaman अंतरिम बजेट सादर करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. आज सहाव्यांदा सलग त्या बजेट सादर करतील. काही वेळापूर्वीच त्या अर्थमंत्रालयामध्ये दाखल झाल्या असून त्यांच्या सहकार्यांसोबत त्या बजेट सादर मांडण्यापूर्वी मीडीया समोर आल्या होत्या.
केंद्रीय अर्थमंत्री Nirmala Sitharaman अर्थ मंत्रालयाकडे रवाना झाल्या आहेत. दुपारी 11 वाजता लोकसभेमध्ये त्या अंतरिम अर्थसंकल्पाच्या वाचनाला सुरूवात करणार आहेत. हा त्यांच्याकडून मांडला जाणारा सहावा अर्थसंकल्प असल्याने त्यांच्यासाठी हा खास अर्थसंकल्प असणार आहे.
पहा ट्वीट
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आज (1 फेब्रुवारी) मोदी सरकारच्या दुसर्या टर्म मधील शेवटचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. हा अर्थसंकल्प आगामी लोकसभा निवडणूकांच्या वर्षातील असल्याने पूर्ण नसून अंतरिम अर्थसंकल्प आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पामध्ये काही लोकप्रिय घोषणा होऊ शकतात. त्यामुळे सर्वसामान्यांचे या बजेट कडे विशेष लक्ष आहे. आज सकाळी 11 वाजता अर्थमंत्री लोकसभेत अर्थसंकल्प मांडणार आहेत. काल अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी हे बजेट नारी शक्तीला समर्पित असल्याची भावना बोलून दाखवली आहे. तसेच निवडणूकीनंतर आपण पूर्ण बजेटही सादर करू असा विश्वास वर्तवला आहे.
दरम्यान आजचा अर्थसंकल्प हा अंतरिम असल्याने सरकारला तात्पुरत्या आर्थिक व्यवहारांसाठी लागणार्या रक्कमेचा यामध्ये लेखाजोखा मांडला जातो. त्यामुळे काल बजेट पूर्वी आर्थिक सर्वेक्षण देखील जाहीर करण्यात आलेले नाही. परंतू या बजेट मध्ये ग्रीन एनर्जी, शेतकरी आणि कष्टकरी समाजासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या जाऊ शकतात. देशाला जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचं उद्दिष्ट पंतप्रधान मोदी यांनी ठेवलं असल्याने त्या दृष्टीने उद्योगाला चालना देण्यसाठी काही घोषणा होणार का? हे पाहणं गरजेचे आहे. मात्र हे अंतरिम बजेट असल्याने कोणत्याही नव्या योजना सुरू केल्या जाणार नाहीत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)