Union Budget 2021-22 विकास आणि विश्वासाचं : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया
सोबतच या बजेटमधील तरतुदींमुळे आपण कोरोना संकटाच्या आव्हानांवर मात करू अशी आशा मोदींनी व्यक्त केली आहे.
आज लोकसभेमध्ये अर्थसंकल्प 2021 सादर झाला आहे. करदात्यांना किंवा सर्वसामान्यांसाठी कोणतीही मोठी घोषणा यंदा झाली नसली तरीही आरोग्याच्या दृष्टीने आणि लॉकडाऊन, कोरोना संकट यांच्या माध्यमातून झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी या अर्थ संकल्पात काही गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना हे बजेट विकास आणि विश्वासाचं असल्याचं म्हटलं आहे. सोबतच या बजेटमधील तरतुदींमुळे आपण कोरोना संकटाच्या आव्हानांवर मात करू अशी आशा मोदींनी व्यक्त केली आहे. (हेही वाचा, Union Budget 2021: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला सर्वसाधारण अर्थसंकल्प; कोणत्या क्षेत्राला किती कोटी रुपये मिळाले जाणून घ्या)
दरम्यान अर्थ मंत्रालयाने कोस्टल भागातील म्हणजेच तामिळनाडू, पश्चिम बंगाल येथील भागात व्यवसाय केंद्र बनवण्याच्या दृष्टीने विशेष तरतूद केलेली दिसते इन्फ्रास्टक्चर मध्ये बदल घडवताना नोकर निर्मिती करत तरूणांना नोकरीची संधी निर्माण करून दिली जाणार आहे. Agriculture Infrastructure Fund च्या माध्यमातून APMC markets चं सक्षमीकरण केले जाणार आहे. त्यामुळे शेतकर्यांना देखील दिलासा असेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
ANI Tweet
आज सत्ताधार्यांकडून यंदाचं बजेट आव्हानात्मक स्थितीतील असल्याचं म्हणताना ते पारदर्शक असल्याचं म्हटलं असलं तरीही विरोधकांकडून मात्र त्यावर टीका होत आहे. महाराष्ट्रातील शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देशाच्या आर्थिक राजधानीला काय मिळालं? असा सवाल उपस्थित केला आहे तर एनसीपी खासदार अमोल कोल्हे यांनी उल्लेख आत्मनिर्भर भारत पण कृती मात्र पुंजीपतीनिर्भर भारत असा टोला लगावत आजचा केंद्रीय अर्थसंकल्प ठराविक भांडवलदारांना धार्जिणा आहे. सरकारी मिळकती विकून त्यातून पैसा कमाविणे ही अतिशय गंभीर व धोकादायक बाब आहे. असं म्हटलं आहे.