गँगस्टर छोटा राजन याला हॉटेल व्यावसायिक बी आर शेट्टी हत्येप्रकरणी आठ वर्षांचा तुरुंगवास
आर. शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी कुख्यात अंडरवर्ल्ड गँगस्टर राजेंद्र निकाळजे ऊर्फ छोटा राजन व अन्य पाच जणांना आज, विशेष न्यायालयाने आठ वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. सोबतच या आरोपींना प्रत्येकी पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
मुंबई: हॉटेल व्यावसायिक बी. आर. शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी कुख्यात अंडरवर्ल्ड गँगस्टर राजेंद्र निकाळजे ऊर्फ छोटा राजन (Chota Rajan) व अन्य पाच जणांना आज, विशेष न्यायालयाने आठ वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. सोबतच या आरोपींना प्रत्येकी पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली छोटा राजनला ही शिक्षा ठोठावली आहे. प्राप्त माहितीनुसार छोटा राजनसहीत नित्यानंद नायक, सेल्विन डॅनियल, रोहित थंगप्पन जोसेफ उर्फ सतीश कालिया, दिलीप उपाध्याय आणि तलविंदर सिंग या आरोपींना मकोका कायदा आणि भादंविच्या अनेक कलमांतर्गत आरोप सिद्ध झाले आहेत. ज्यानुसार या सहाही जणांना आठ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. (दहशतवादी कसाब ला जिवंत पकडायला मदत करणारे संजय गोविलकर यांचे निलंबन; दाऊदच्या साथीदाराला सोडून दिल्याचा आरोप)
बी. आर. शेट्टी यांचे हत्याप्रकरण हेऑक्टोबर 2012 मध्ये घडले होते. शेट्टी आपल्या मित्राला भेटायला जात असताना त्यांच्या गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. यानंतर हत्येप्रकरणी पोलिसांनी छोटा राजनवर हत्येचा आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. तसेच मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने या अन्य सहा आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. आज अखेरीस या प्रकरणावर विशेष न्यायालयाने निर्णय दिला आहे. मुंबई: दाऊद इब्राहिम याचा पुतण्या रिजवान कासकर ला खंडणी विरोधी पथकाकडून अटक
ANI ट्विट
दरम्यान, छोटा राजन हा सध्या तिहार जेल मधील 2 नंबर जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. मागील काही दिवसांपासून त्याला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कडून वारंवार खाण्यातून विष देऊन जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. यानुसार आता छोटा राजन याला हाय टेक सिक्युरिटी मध्ये ठेवण्यात आले आहे.