Umar Khalid: कोण आहे उमर खालिद? चार वर्षे तुरुंगात, पण का नाही मिळत जामीन? घ्या जाणून

Who is Umar Khalid? जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिद 2020 च्या दिल्ली दंगलीत कथित सहभाग असल्याच्या आरोपाखाली चार वर्षे जामीन न देता तुरुंगात आहे. प्रदीर्घ काळ तुरुंगात असणे आणि जामीन न मिळणे यावरुन सध्या वाद सुरु झाला आहे.

Umar Khalid | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

उमर खालिद (Who is Umar Khalid?), वय वर्षे 36. मुक्काम तिहार कारागृह. पाठिमागीर चार वर्षांपूर्वी एका प्रकरणात अटक झाली. तेव्हापासून दिल्ली विद्यापीठाचा (JNU) हा माजी विद्यार्थी तुरुंगातच आहे. ना जामीन ना सुटका. या तरुणाला दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने दंगलीत त्याच्या कथित भूमिकेसाठी अटक केली होती, ज्यात 53 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी बहुतेक मुस्लिम होते. सन 2020 च्या (Delhi Riots 2020) ईशान्य दिल्लीतील दंगलीत गैरव्यवहार (UAPA) कायद्यांतर्गत अटक करण्यात आलेल्या उमर खालिद याला चार वर्षांनंतरही खटल्याची आणि जामीनाची प्रतीक्षा आहे. असे काय आहे कारण, ज्यामुळे हा तरुण इतकी वर्षे तुरुंगात आहे. कोण आहे हा तरुण? आणि त्याला जामीन का नाही मिळत? घ्या जाणून.

जामीन विलंब आणि न्यायालयीन प्रक्रिया आणि घटनाक्रम

सन 2020 च्या दिल्ली दंगलीमुळे 2,500 हून अधिक व्यक्तींना अटक करण्यात आली, गेल्या काही वर्षांमध्ये 2,000 हून अधिक लोकांना जामीन देण्यात आला. मात्र, उमर खालिद यासह 17 जणांना मात्र अद्यापही जामीन मिळाला नाही. या 17 जणांना एका मोठ्या षडयंत्र प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याच्यासोबत असलेल्या अनेक सह-आरोपींना जामिनावर सोडण्यात आले आहे. खालिद मात्र अद्यापही कायदेशीर आव्हानांच सामना करत तुरुंगात खितपत पडून आहे. (हेही वाचा, NIRF Rankings 2024: देशातील यंदाच्या सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्थेंची यादी जाहीर; पुन्हा एकदा IIT Madras अव्वल, जाणून घ्या सविस्तर)

न्यायालयाने फेटाळला जामीन, सुनावणीसही विलंब

अटक झाल्यानंतर 18 महिन्यांनंतर मार्च 2022 मध्ये करकरदोमा न्यायालयाने खालिद यास जामीन नाकारला होता. ऑक्टोबर 2022 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात त्यांनी केलेले अपीलही फेटाळण्यात आले. खालिदने त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, परंतु त्याची जामीन सुनावणी 14 महिन्यांत 11 वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. ज्यामध्ये वकिलाची अनुपलब्धता आणि अभियोक्तांच्या विनंत्यांचा समावेश आहे. ऑगस्ट 2023 मध्ये अशाच एका प्रकरणात न्यायाधीश ए.एस. बोपन्ना आणि पी. के. मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने खंडपीठाच्या कॉन्फिगरेशनच्या मुद्द्यांचा हवाला देत खालिदची सुनावणी पुढे ढकलली. नंतर, हे प्रकरण दुसऱ्या खंडपीठाकडे हस्तांतरित करण्यात आले.

उमर खालिद याच्याकडून जामीनासाठी वारंवार अर्ज

जेएनयूचा माजी विद्यार्थ्यी असेल्या उमर खालिद याने 14 फेब्रुवारी 2024 रोजी "बदललेल्या परिस्थितीचा" हवाला देत सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन अर्ज मागे घेतला. दरम्यान, त्याच्या खटल्यात विलंब आणि अनेक सह-आरोपींची सुटका केल्याचा हवाला देत त्याने पुन्हा जामीन मागितला. मात्र, 28 मे रोजी त्याची विनंती नाकारण्यात आली. दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर त्याची शेवटची याचिका प्रलंबित आहे. खालिदचा साथीदार, दिल्लीतील संशोधक बनोज्योत्स्ना लाहिरी यांनी खटल्याशिवाय त्याच्या दीर्घ कारावासावर निराशा व्यक्त केली आणि म्हटले की, तो द्वेषाविरूद्ध शांततापूर्ण प्रतिकार करतो. खालिदला लवकरच योग्य सुनावणीसह न्याय आणि जामीनही मिळेल.

जामिनावर सर्वोच्च न्यायालयाची भूमिका

सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेळा पुनरावृत्ती केली आहे की "कोणत्याही कैद्याला मिळणारा जामीन हा त्याचा हक्क आहे. तुरुंग हा अपवाद आहे, अगदी यूएपीए प्रकरणांमध्येही. ऑगस्ट 2023 मध्ये न्यायाधीश अभय एस.ओक आणि ऑगस्टीन जॉर्ज मशीह यांनी यावर जोर दिला की, योग्य प्रकरणांमध्ये जामीन नाकारणे मूलभूत हक्कांचे उल्लंघन करते. दुसऱ्या खंडपीठाने असे अधोरेखित केले की गुन्हा काहीही असो, शिक्षा म्हणून जामीन रोखला जाऊ नये.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now