Vijay Mallya चे भारतात प्रत्यार्पण होणार, London कोर्टाने दिली मंजुरी
तर लंडनच्या कोर्टाने परवानगी दिल्याने मल्ल्याला भारतात येणार आहे.
मद्य सम्राट विजय मल्ल्या (Vijay Mallya)च्या भारतातील प्रत्यार्पणाचा अखेर मार्ग मोकळा झाला आहे. तर लंडनच्या कोर्टाने परवानगी दिल्याने मल्ल्याला भारतात येणार आहे.
विजय मल्ल्या हा 9 हजार कोटींपेक्षा अधिक कर्ज घेऊन विदेशात स्थायिक झाला होता. त्यामुळे भारतीय सरकारची नाचक्की झाल्याचे चित्र उभे राहिले होते. त्यावेळ पासून भारताकडून सतत विजय मल्ल्याच्या प्रत्यापर्णाचे प्रयत्न सुरु होते.
मल्ल्याला या प्रकरणी सोमवारी ब्रिटनच्या न्यायालयात हजर राहणार होता. तसेच या प्रकरणावर महत्तवपूर्ण सुनावणी झाली असून मल्ल्याला प्रत्यार्पणाची मंजूरी देण्यात आली आहे. तर भारतात मल्ल्याला आणण्यासाठी सीबीआय (CBI) आणि ईडी (ED) पथक रविवारी ब्रिटनला गेले आहेत.