UIDAI कडून मोठी घोषणा, आधार कार्ड नसेल तरीही घेता येणार लसीचा डोस

UIDAI कडून मोठी घोषणा, आधार कार्ड नसेल तरीही घेता येणार लसीचा डोस
Aadhar Card (Photo Credits-Twitter)

युआयडीएआय (UIDAI) कडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार कोरोनाची लस (COVID19 Vaccine) घ्यायची असल्यास आधार कार्ड अनिवार्य नसल्याचे म्हटले आहे. युआयडीएआयने असे म्हटले की आधार कार्ड (Aadhar Card)  नसले तरीही कोरोनाची लस मिळण्यापासून दूर राहू शकत नाहीत. या व्यतिरिक्त एका विधानात असे म्हटले की, जर आधार कार्ड नसेल तर कोणत्याही रुग्णाला औषध, रुग्णालयात दाखल करुन घेणे किंवा उपचार करण्यासंबंधित नाकारु शकत नाही.(लसीचा पुरवठा करणाऱ्या Bharat Biotech च्या 50 कर्मचाऱ्यांना Covid-19 ची लागण; देशाची वाढली चिंता)

आधार कार्डसाठी एक्सेप्शन हँडलिंग मॅकेनिज्म (EHM) स्थापित केले असून 12 अंकाच्या बायोमॅट्रिक आयडीच्या अभावात सुविधा आणि सर्विसची डिलिव्हरी ठरवण्यासाठी याचे पालन केले पाहिजे. युआयडीएआय यांनी पुढे असे म्हटले की, कोणत्याही व्यक्तिला तुम्ही गरजेचे सामान यासाठी देत नाहीत की त्याच्याकडे आधार कार्ड नाही आहे. तर त्यांच्यासाठी आधार हे कारण बनले नाही पाहिजे. आधार कार्डाशिवाय सुद्धा महत्वाचे काम आणि सुविधेचा वापर केला जाऊ शकतो.

देशात कोरोना व्हायरसच्या महासंकटात युआडीएआय यांनी केलेले विधान महत्वपूर्ण आहे. जर एखाद्याकडे आधार कार्ड नसल्यास किंवा कोणत्या कारणास्तव आधार ऑनलाईन वेरिफिकेशन यशस्वी न झाल्यास या संबंधित एजेंसी विभागाला आधार अधिनिय, 2016 मधील निर्धारित विशिष्ट मानदंडानुसार सेवा द्यावी लागेल.(Covishield लसीच्या दोन डोसमधील अंतर 12-16 आठवड्यांपर्यंत वाढवले; सरकारने दिली मान्यता)

तर भारतामध्ये कोवॅक्सिन, कोविशिल्ड यांच्यासोबतीने आता स्फुटनिक वी ही तिसरी लसदेखील उपलब्ध झाली आहे. 14 मे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर या लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. सध्या स्फुटनिक वी लसीच्या 2 खेपी भारतामध्ये दाखल झाल्या आहेत. त्यांना भारताच्या हिमाचल प्रदेशातील Kasauli येथील Central Drugs Laboratory कडून परवानगी मिळाल्यानंतर आजपासून ही लस नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहे. सध्या मर्यादित साठा असल्याने ही लस मोजक्या ठिकाणी उपलब्ध आहे. हैदराबाद मध्ये डॉ. रेड्डीज लॅबचे Global Head of Custom Pharma Services,Deepak Sapra यांना ही पहिली लस देण्यात आली आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 16, 2021 02:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).