अनेक लहान सहान कामांमध्ये भारातीयांना आधार कार्ड विचारलं जातं. त्यामुळे आता कधीही आणि कुठूनही ई आधार कार्ड डाऊनलोड करण्याची प्रक्रिया भारत सरकार कडून आता अधिक सुलभ करण्यात आली आहे. The Unique Identification Authority of India (UIDAI) कडून नुकतीच एक ऑनलाईन लिंक शेअर करण्यात आली आहे. त्यावर तुम्हांला आधार कार्ड सहज डाऊनलोड करता येऊ शकते. याकरिता तुम्हांला केवळ तुमचा 12 अंकी आधार क्रमांक माहित असणं आवश्यक आहे. eaadhaar.uidai.gov.in या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर तुम्ही ते सहज डाऊनलोड देखील करू शकता. (नक्की वाचा: Aadhaar Card for Newborn: तुमच्या नवजात बालकाचं आधार कार्ड अवघ्या 2 कागदपत्रांच्या मदतीने uidai.gov.in वर अप्लाय कसं कराल? )
UIDAI कडून त्यांच्या ट्वीटर अकाऊंट द्वारा ही ऑनलाईन लिंक शेअर करण्यात आली आहे. यावर तुम्हांला नेहमीचं आधारकार्ड डाऊनलोड करण्याची किंवा मास्क आधारकार्ड डाऊनलोड करण्याच्या दोन्ही पर्यायांची सोय आहे. रेग्युलर आधार कार्ड मध्ये तुम्हांला आधारकार्डावर सारि माहिती दिसणार आहे. तर मास्क्ड वर शेवटचे 4 अंक दिसतील आणि पहिले 8 अंक लपलेले असतील. (Aadhaar Card Update: Face Authentication फीचरचा वापर करून uidai.gov.in वरून आधार कार्ड डाऊनलोड कसं कराल?).
eaadhaar.uidai.gov.in वरून तुमचं आधार कार्ड कसं कराल डाऊनलोड?
- eaadhaar.uidai.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
- आधार क्रमांका वरून आधार कार्ड डाऊनलोड करण्याचा पर्याय निवडा.
- रेग्युलर की मास्क्ड आधार कार्ड यापैकी तुम्हांला हवा असलेला पर्याय निवडा.
- तुमचा आधार नंबर, पिन कोड आणि नाव ही सारी माहिती नीट भरा.
- त्यानंतर सिक्युरिटी कोड टाका.
- 'Request OTP' वर क्लिक करा.
- तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी टाका.
- आता तुम्हांला पासवर्डच्या आधारे तुमचं आधार कार्ड डाऊनलोड करता येणार आहे.
भारतामध्ये प्रत्येक नागरिकाला त्याचा आधार कार्ड नंबर म्हणून एक खास 12 अंकी क्रमांक मिळतो. आधार कार्ड हे ओळखपत्र आणि वास्तव्याचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणारे देशातील महत्त्वाचं कागदपत्र आहे.