Sabarimala Temple: शबरीमला मंदिरात अखेर दोन महिलांनी केला प्रवेश,शुद्धीकरणासाठी मंदीर बंद! (Video)

बिंदु आणि कनकदुर्गा या महिलांनी रात्री पायर्‍या चढायला सुरूवात केली पहाटे 3:45वाजता अय्यापाचं दर्शन घेतलं.

Sabarimala Temple (Photo Credits: ANI)

केरळमधील शबरीमला (Sabarimala Temple) मंदिरात बुधवारी पहाटे  दोन महिलांनी यशस्वीरित्या प्रवेश करून देवदर्शन घेतले आहे.  या महिला 50 हून कमी वयाच्या असून पोलिस संरक्षणामध्ये त्यांनी मंदिरात प्रवेश केला. बिंदु(Bindu)  आणि कनकदुर्गा (Kanakdurga) अशी या दोन महिलांची नावं आहेत. रात्रीपासून या महिलांनी पायर्‍या चढायला सुरूवात केली पहाटे 3:45वाजता अय्यापाचं दर्शन घेतलं.  शबरीमला मंदिरामध्ये महिलांनी प्रवेश केल्याची माहिती समजताच सध्या मंदिर शुद्धीकरणासाठी बंद करण्यात आलं आहे.

पिनाराई विजयन (Pinarayi Vijayan)या केरळच्या मुख्यमंत्रांनी महिलांच्या मंदिर प्रवेशासाठी पोलिसांनी महिलांना संरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती देण्यात आली आहे.

शबरीमला मंदिरामध्ये स्त्रियांच्या प्रवेशावर स्थानिकांनी विरोध केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शबरीमला मंदिरामध्ये जाण्यास परवानगी दिली आहे. मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे मागील अनेक दिवसांपासून या परिसरात तणावाचं वातावरण आहे.