Maharashtra Assembly Elections 2024: विधानसभा निवडणुकीची तयारी...राज्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; निवडणूक आयोगाचे आदेश
महसूल आणि पोलीस दलातील १४ अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत.
Maharashtra Assembly Elections 2024: राज्यातील विधानसभा निवडणुका(Assembly Election) पारदर्शी वातावरणात पार पडाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने मोठी पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. महसूल आणि पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्याचे (Transfer)आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. राज्यातील पोलीस दलातील 14 अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. यात महसूल, पोलीस, उत्पादनशुल्क, महापालिका, महामंडळातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मंगळवारपर्यंत म्हणजेच उद्यापर्यंत या बदल्या करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत. (हेही वाचा: Maharashtra Assembly Elections: अजून का झाली नाही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा? Election Commission ने सांगितले कारण)
राज्यातील विधानसभा निवडणुका मुक्त आणि पारदर्शी वातावरणात पार पडाव्यात हा या मागचा उद्दे आहे. त्यानुसार एकाच पदावर तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेल्या किंवा गृह जिल्हा असलेल्या पोलीस दलातील आयुक्त, पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपायुक्त, निरीक्षक, उपनिरीक्षक आदी तसेच जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी अशा महसूल अधिकाऱ्यांच्या तसेच विभागीय आयुक्त, पालिका आयुक्त, महामंडळांमध्ये प्रतिनियुक्तीवर नियुक्त असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत. बदल्यांच्या या नियमातून पालिका आयुक्त आणि महामंडळातील अधिकाऱ्यांना यापूर्वी सूट होती, मात्र लोकसभा निवडणुकीपासून या अधिकाऱ्यांनाही निवडणूक आयोगाने बदल्यांचे नियम लागू केले आहेत.