बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे येत्या 15 मे रोजी खुलणार, सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करत मुख्य पुजाऱ्यांसह फक्त 27 जणांना उपस्थिती राहण्याची परवानगी
देशात सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता लॉकडाउनचे आदेश लागू करण्यात आल्याने मंदिरात कोणत्याही भाविकाला येणार परवानगी नाही आहे.
उत्तराखंड (Uttarakhand) मधील बद्रीनाथ मंदीराचे (Badrinath Temple) दरवाजे येत्या 15 मे रोजी खुलणार आहे. देशात सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता लॉकडाउनचे आदेश लागू करण्यात आल्याने मंदिरात कोणत्याही भाविकाला येणार परवानगी नाही आहे. यावेळी मात्र आता फक्त मुख्य पुजारी यांच्यासह फक्त 27 जण मंदिराचे दरवाजे खुलण्याचा वेळी उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच दरवाजे खोलताना सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे सुद्धा पालन केले जाणार आहे.जोशीमठचे एसडीएम अनिल चन्याल यांनी असे म्हटले आहे की, देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे सरकारने लॉकडाउनचा निर्णय जाहीर केला आहे.
लॉकडाउनचे नियम लक्षात ठेवून बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे खुले करण्यात येणार आहेत. दरवाजे खोलताना फक्त 27 जणांना तेथे उपस्थित राहण्याची परवानगी असणार आहे. तसेच प्रत्येकजण निर्धारित अंतरावर उभे राहणार असून त्यावेळी मास्क लावणे अनिवार्य असणार आहे. एसडीएम यांनी दरवाजे खोलण्यापूर्वी येथे संपूर्ण तयारी केली आहे. लाईट-पाण्यासह सर्व मुलभूत सुविधा सुरु झाल्या आहेत. बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे 15 मे रोजी पहाटे 4.30 वाजता खुले करण्यात येणार आहेत.(देवाच्या घरातील नोकरीही असुरक्षित; देशातील सर्वात श्रीमंत मंदिर ‘तिरुपती बालाजी ट्रस्ट’ मधून 1300 कर्मचार्यांची हकालपट्टी)
स्थानिक प्रशासनाकडून कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पूर्णपणे खबरदारी घेतली जात आहे. एसडीएस यांनी सांगितले की, मुख्य पुजारी पोहचले आहेत. केरळ येथून ऋषीकेश येथे आल्यानंतर त्यांना 14 दिवस क्वारंटाइन करण्यात आले होते. क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जोशीमठ येथे आणण्यात आले आहे.