तुरुंगात Tik Tok चा व्हिडिओ शूट करणे महिला पोलिसाला पडले महागात, गमावली नोकरी (Watch Video)

गुजरात (Gujrat) येथील एका पोलीस स्थानकातच्या तुरुंगात डान्स करणाऱ्या एका महिला पोलिसाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.

तुरुंगात डान्स करणारी महिला पोलीस (फोटो सौजन्य-Twitter)

गुजरात (Gujrat) येथील एका पोलीस स्थानकातच्या तुरुंगात डान्स करणाऱ्या एका महिला पोलिसाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामध्ये महिलेने टिकटॉक (Tik Tok) अॅपच्या सहाय्याने व्हिडिओ बनवल्यामुळे गुजरातच्या पोलिसांनी नाराजगी व्यक्त केली आहे. महिला पोलिस तरुंगाच्या बाजूला असलेल्या जागेवर डान्स करताना दिसून आली. या प्रकारामुळे पोलिसांच्या नियमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तरुंगात नाचगाणे करुन दाखवल्यामुळे पोलिसांना मान डावळला जात असल्याचे ही बोलले जात आहे.

मेहसाणा जिल्ह्यामधील लंघनाज मधील एका पोलिस स्थानकात पोलीस महिलेने टिकटॉकवर व्हिडिओ शूट केला. मात्र उच्चाधिकाऱ्यांनी हा व्हिडिओ पाहिला असता महिला पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी चौकशी करण्यात यावी असे सुद्धा आदेश देण्यात आला आहे.

तर डीव्हायएसीपी मंजिता वंजारा यांना या महिलेचा तपास करण्यास सांगितला आहे.

(विमान टेकऑफ साठी सज्ज असताना 'तो' चढला विमानाच्या पंख्यावर Watch Video)

जगभरात सध्या टिकटॉकची क्रेझ दिसून येत आहे. तरीही काही कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात हे अॅप अडकले आहे. हे अॅप वापरणाऱ्या युजर्सची वैयक्तिक माहिती सुरक्षित रहावी म्हणून काही मुद्द्यांवर शासकीय तपासणी सुरु आहे. तर गेल्याच आठवड्यात दिल्लीमधील एक महिलेने टिकटॉकवर एक व्हिडिओ शूट करत त्यामध्ये ड्रायव्हर, कंडक्टर यांच्यासोबत डान्स करताना दिसून आली होती.