Bomb Threat to Haryana CM Residence: हरियाणा सचिवालय आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलिसांकडून परिसरात शोधमोहीम सुरू

हरियाणा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला आणि सचिवालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी येणारा ईमेल प्राप्त झाला आहे. त्यानंतर, तात्काळ चंदीगड पोलिसांनी सचिवालय परिसर रिकामा केला. तसेच सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले.

Bomb Threat to Haryana CM Residence: हरियाणा सचिवालय आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलिसांकडून परिसरात शोधमोहीम सुरू
Bomb Threat | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Bomb Threat to Haryana CM Residence: हरियाणून मोठी बातमी समोर येत आहे. हरियाणा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला (Haryana CM Residence) आणि सचिवालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी (Bomb Threat) येणारा ईमेल प्राप्त झाला आहे. त्यानंतर, तात्काळ चंदीगड पोलिसांनी सचिवालय परिसर रिकामा केला. तसेच सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, ही धमकी एका ईमेलद्वारे देण्यात आली होती, ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर आणि सचिवालयावर हल्ला करण्याचे स्पष्टपणे सांगितले होते.

प्राप्त माहितीनुसार, ईमेलमध्ये आत्मघाती हल्ल्याचाही उल्लेख होता. मेल प्राप्त होताच, सुरक्षा दलांनी कोणताही विलंब न करता संपूर्ण परिसर रिकामा केला आणि बॉम्ब पथक तैनात करून तपास सुरू केला. पोलिसांनी संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबवली आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवली. (हेही वाचा - Mumbai Bomb Threat: मुंबई पोलिस हेल्पलाईन नंबर 112 वर आला धमकीचा खोटा कॉल; FIR दाखल)

हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला बॉम्बने उडवण्याची धमकी - 

यापूर्वी, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयालाही अशाच प्रकारच्या धमक्या मिळाल्या आहेत, ज्यामुळे हा एखाद्या मोठ्या कटाचा भाग असू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. पोलिस आणि सायबर सेल आता त्यामागील खरा हेतू आणि स्रोत शोधण्यासाठी ईमेलची चौकशी करत आहेत.

(The above story first appeared on LatestLY on May 30, 2025 07:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).