Air India Plane Crash: 'या' कारणामुळे झाला एअर इंडिया विमानाचा अपघात; AAIB च्या अहवालात धक्कादायक खुलासा
वैमानिकांनी हवेत इंजिन पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. इंजिन 1 मध्ये अंशतः सुरू झाले. तर दुसरे इंजिन पुन्हा सुरू करण्यात अयशस्वी झाले. धावपट्टीपासून 0.9 नॉटिकल मैल अंतरावर असलेल्या हॉस्टेलमध्ये कोसळण्यापूर्वी विमान फक्त 32 सेकंदांसाठी हवेत राहिले.
Air India Plane Crash: एअर इंडियाच्या विमान (Air India Plane) एआय 171 च्या दुर्दैवी अपघाताबाबत एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने शनिवारी त्यांचे प्राथमिक निष्कर्ष जाहीर केले आहेत, ज्यामध्ये असे दिसून आले आहे की दोन्ही इंजिनचे इंधन नियंत्रण स्विच टेकऑफ केल्यानंतर काही सेकंदातच बंद पडले होते. 12 जून रोजी झालेल्या या अपघातात विमान अहमदाबाद विमानतळाजवळील मेडिकल हॉस्टेल कॉम्प्लेक्समध्ये कोसळल्यानंतर विमानातील आणि जमिनीवरील सर्व 260 लोकांचा मृत्यू झाला.
टेकऑफनंतर इंजिन बंद पडले -
अहवालानुसार, विमानाचे दोन्ही इंजिन टेकऑफ केल्यानंतर काही सेकंदातच बंद पडले. तपासकर्त्यांना असे आढळून आले की इंधन कटऑफ स्विच 'RUN' वरून 'CUTOFF' वर फक्त एका सेकंदाच्या अंतराने हलवले गेले, ज्यामुळे इंजिनची शक्ती पूर्णपणे बंद झाली. तथापी, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (सीव्हीआर) डेटावरून वैमानिकांमधील संभाषणही रेकॉर्ड झालं आहे. यात एक पायलट दुसऱ्या पायलटला विचारतो 'तुम्ही का कट ऑफ का केला?' ज्यावर दुसऱ्याने उत्तर दिले, 'मी नाही केले.' जे संभाव्य गोंधळ किंवा इंधन स्विच ऑपरेशनमध्ये तांत्रिक विसंगती दर्शवते. (हेही वाचा - Building Collapses in Delhi: दिल्लीत चार मजली इमारत कोसळली; 12 जण अडकल्याची भीती)
दरम्यान, वैमानिकांनी हवेत इंजिन पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. इंजिन 1 मध्ये अंशतः सुरू झाले. तर दुसरे इंजिन पुन्हा सुरू करण्यात अयशस्वी झाले. धावपट्टीपासून 0.9 नॉटिकल मैल अंतरावर असलेल्या हॉस्टेलमध्ये कोसळण्यापूर्वी विमान फक्त 32 सेकंदांसाठी हवेत राहिले.
पक्षी धडकण्याची घटना नाही
तथापी, उड्डाण मार्गाच्या परिसरात पक्ष्यांच्या कोणत्याही महत्त्वपूर्ण हालचाली आढळून आल्या नाहीत, असेही AAIB ने आपल्या अहवालात नमूद केले आहे. तसेच इंधन नमुन्यांमध्ये दूषितता किंवा अयोग्य इंधन भरण्याचे कोणतेही संकेत नसल्याचे दिसून आले. याशिवाय, अपघातावेळी हवामान सामान्य आणि दृश्यमानता चांगली होती.
पायलटचे क्रेडेन्शियल्स आणि फिटनेस
अहवालात पुष्टी झाली की दोन्ही पायलटने चांगली विश्रांती घेतली होती. त्यामुळे वैद्यकीयदृष्ट्या ते तंदुरुस्त होते. त्यांना विमान उडवण्याचा दिर्घ अनुभव होता. विमान त्याच्या वजन आणि संतुलन मर्यादेत चालत होते आणि त्यात कोणताही धोकादायक माल वाहून नेण्यात आला नव्हता. अंतिम चौकशी अहवालात या भयानक अपघातामागील कारणांचे अधिक व्यापक चित्र मिळण्याची अपेक्षा आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)