विकृतीचा कळस! 13 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; स्तन, गुप्तांग आणि जीभ कापली, Bihar मधील धक्कादायक घटना
हे प्रकरण समोर आल्यानंतर सीपीआय-एमएलची टीमही गावात पोहोचली आणि मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या घटनेबाबत सीपीआय-एमएलचे कल्याणपूर ब्लॉक सचिव दिनेश कुमार आणि पुसा ब्लॉक सचिव अमित कुमार यांनी आरोपींना शिक्षा करण्याचे आश्वासन कुटुंबीयांना दिले.
बिहारमधील (Bihar) समस्तीपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे काही नराधमांनी 13 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) करून तिचे गुप्तांग, स्तन आणि जीभ कापून टाकली. त्यानंतर ही मुलीचा मृत्यू झाला असे समजून, तिला तसेच एका बागेत फेकून ते पळून गेले. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आता हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना समस्तीपूर जिल्ह्यातील चकमेहसी पोलीस स्टेशन परिसरातील आहे.
नातेवाईकांनी सांगितले की 11 नोव्हेंबर 2022 रोजी काही लोकांनी मुलीला घरातून उचलले आणि सोबत नेले. यानंतर सर्वांनी तिच्यावर बलात्कार करून मुलीला बेशुद्धावस्थेत घराजवळील बागेत सोडले. बरीच शोधाशोध केल्यावर मुलगी बागेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. स्थानिक सीपीआय (एमएल) टीमला या प्रकरणाची माहिती मिळाल्यावर ही घटना उघडकीस आली.
स्थानिक ग्रामस्थ देणगी जमा करून मुलीवर उपचार करत आहेत. मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. समस्तीपूरचे एसपी हृदय कांत म्हणाले, ’13 वर्षांच्या मुलीवर बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. चकमेहसी पोलिसांना मुजफ्फरपूरला जबाब घेण्यासाठी पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेतील दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही.’ (हेही वाचा: श्रद्धा वालकरच्या खून प्रकरणावर 'लव्ह जिहाद' चा संशय मुलीच्या वडिलांकडून व्यक्त; Aftab ला मृत्यूदंड व्हावा याची मागणी)
हे प्रकरण समोर आल्यानंतर सीपीआय-एमएलची टीमही गावात पोहोचली आणि मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या घटनेबाबत सीपीआय-एमएलचे कल्याणपूर ब्लॉक सचिव दिनेश कुमार आणि पुसा ब्लॉक सचिव अमित कुमार यांनी आरोपींना शिक्षा करण्याचे आश्वासन कुटुंबीयांना दिले. मुलीवर अत्याचाराच्या सर्व मर्यादा ओलांडणाऱ्या नराधमांबाबत परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. या कृत्याला जबाबदार असलेल्या नराधमांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पोलिसांकडे केली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Nov 15, 2022 05:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

