खुशखबर! देशात 13 जानेवारी रोजी दिला जाऊ शकतो कोरोना विषाणू लसीचा पहिला डोस; आरोग्य सचिव राजेश भूषण यांची माहिती
त्यापैकी केवळ 44 टक्के रुग्ण रुग्णालयांमध्ये आहेत तर 56 टक्के लोकांना घरात आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. हे लोक असिम्प्टेमॅटिक आहेत किंवा त्यांच्यामध्ये सौम्य लक्षणे आढळली आहेत.
नव्या वर्षात भारतीयांना आनंदाची बातमी मिळत 3 जानेवारी रोजी, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या 'कोव्हिशील्ड' (Covishield) आणि भारत बायोटेकच्या 'कोवॅक्सिन' (Covaxin) या लसींना आपत्कालीन परिस्थितीत वापर करण्यास मंजुरी मिळाली होती. आता आरोग्य मंत्रालयाने (Union Health Ministry) म्हटले आहे की 10 दिवसांत देशात कोरोना विषाणू लसीकरण (Coronavirus Vaccination) सुरू होऊ शकते. कोवॅक्सिन वापरण्यापूर्वी संमती घेणे आवश्यक आहे. मंजुरी मिळाल्यानंतर 10 दिवसानंतर ही लस देणे चालू होऊ शकेल. आरोग्य मंत्रालयाने कोरोनावरील पत्रकार परिषदेमध्ये हे सांगितले. देशातील वेगवेगळ्या राज्यात केले जाणारे लसीचे ड्राय रनही यशस्वी ठरले असल्याची माहिती देण्यात आली.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी मोठी घोषणा करताना सांगितले की, भारतात पहिली कोरोना व्हायरस लस 13 जानेवारीला दिली जाऊ शकते. ड्राय रनच्या रिझल्ट्सच्या आधारे आरोग्य मंत्रालयाने ही घोषणा केली आहे. भूषण यांनी म्हटले आहे की, एमरजंसी यूझ ऑथोरायझेशन झाल्यापासून दहा दिवसांच्या आत लसीकरण सुरू करण्याची तयारी पूर्ण आहे. केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात एक कोटी आरोग्य कर्मचारी आणि दोन कोटी फ्रंटलाईन कर्मचार्यांसह अतिरीक्त प्राधान्य असणार्या लोकांना मोफत लस उपलब्ध करुन देण्यात येईल. पुढे प्राधान्याच्या आधारे जुलै पर्यंत 27 दशलक्ष लोकांना लसी दिली जाईल,
आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, संपूर्ण तयारीसह लसीकरण सुरू केले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेवर डिजिटल माध्यमातून पाळत ठेवली जाईल. फ्रंटलाइन वर्कर्सना लसीकरणासाठी नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. लसीकरण पथकात 5 लोक असतील तसेच लस साठवण्यासाठी देशात 41 हजार कोल्ड स्टोरेज आहेत. अशाप्रकारे येत्या 10-15 दिवसात लसीकरण सुरु होईल यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. (हेही वाचा: भारत बायोटेक, सीरम इन्स्टिट्यूट यांच्यातील भांडण मिटले; संयुक्त पत्रकाद्वारे वादावर पडदा)
दरम्यान, मंत्रालयाने सांगितले की, देशात सक्रिय प्रकरणांची संख्या अडीच लाख आहे. त्यापैकी केवळ 44 टक्के रुग्ण रुग्णालयांमध्ये आहेत तर 56 टक्के लोकांना घरात आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. हे लोक असिम्प्टेमॅटिक आहेत किंवा त्यांच्यामध्ये सौम्य लक्षणे आढळली आहेत. गेल्या आठवड्यात भारतात प्रति लाख लोकसंख्येमध्ये कोरोनाच्या केवळ 96 नवीन घटना समोर आल्या आहेत. त्यापैकी दर दशलक्षात एक मृत्यू आहे.