Telangana: हैद्राबाद येथे नवीन सचिवालयात बांधले जाणार मंदिर, मशिदी आणि चर्च; KCR म्हणाले- गंगा-जमुना तहजीब यांचे असेल प्रतीक
राजधानी हैदराबाद (Hyderabad) मध्ये बांधल्या जाणाऱ्या तेलंगणा सरकारच्या (Telangana Government) नवीन सचिवालय कॉम्प्लेक्समध्ये मंदिरे (Temple), मशिदी (Mosques) आणि चर्च (Church) देखील असणार आहे.
राजधानी हैदराबाद (Hyderabad) मध्ये बांधल्या जाणाऱ्या तेलंगणा सरकारच्या (Telangana Government) नवीन सचिवालय कॉम्प्लेक्समध्ये मंदिरे (Temple), मशिदी (Mosques) आणि चर्च (Church) देखील असणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) यांनी याची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, आगामी विधिमंडळ अधिवेशन संपल्यानंतर त्याच दिवशी सर्व जागांसाठी पायाभरणी केली जाईल. केसीआर म्हणाले की, राज्य सचिवालयात मंदिर-मशिदी आणि चर्चच्या माध्यमातून गंगा-जमुना तहजीब प्रदर्शित केले जातील. तेलंगाना सरकार सर्वधर्म समभावनेचे एक उदाहरण स्थापन करत असताना, सरकारच्या या निर्णयाला काही उजव्या गटांचे नेते वेगवेगळ्या प्रकारे विरोध करीत आहेत.
मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘सरकारी खर्चाने जुन्या सचिवालयाची इमारत पाडण्याच्या वेळी खराब झालेले मंदिर आणि दोन मशिदी बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर ख्रिश्चन समुदायाची मागणी लक्षात घेऊन नव्या सचिवालयात एक चर्चही बांधली जाईल.’ शनिवारी केसीआर यांनी मुस्लिम समाजातील लोकांशीही मशिदीच्या बांधकामाबाबत बैठक घेतली. यावेळी मशिदीच्या क्षेत्रासह इतर सर्व विषयांवर चर्चा झाली.
गेल्या जुलैमध्ये जुन्या सचिवालयाची इमारत जमीनदोस्त केली गेली होती, त्यावेळी तिथल्या धर्मस्थानाचे नुकसान झाले होते. यानंतर नवीन धार्मिक स्थळे बांधली जातील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. त्यानंतर आता तेलंगणा सरकारने मंदिर, दोन मशिदी आणि चर्च बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले, 'सरकार 750 चौरस फूट (एकूण 1500 चौरस फूट) मध्ये इमाम क्वार्टरसह दोन मशिदी तयार करेल. नवीन मशिदी ज्या ठिकाणी नवीन सचिवालयात होते त्याच ठिकाणी बांधल्या जातील. बांधकामानंतर नवीन मशिदी राज्य वक्फ बोर्डाकडे देण्यात येणार आहेत.
राव म्हणाले, मंदिरही याच 1500 चौरस फूट मध्ये तयार केले जाईल आणि बांधकामानंतर हे मंदिर एंडॉवमेंट्स विभागाकडे सुपूर्द केले जाईल.’