Death प्रतिकात्मक फोटो Photo Credit- X

Bihar Congress Leader Shakil Ahmad Khan Son Ayan Suicide: बिहारमधील काँग्रेस आमदार शकील अहमद खान (Shakeel Ahmad)यांच्या 18 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली. पाटणा येथील सरकारी निवासस्थानी त्याचा मृतदेह आढळला. अयान (18) असे त्यांचे नाव आहे. अधिकृत निवासस्थानी त्याचा मृतदेह आढळला. सोमवारी पाटणामध्ये ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अयानने फ्लॅटमध्ये आत्महत्या केली.. (Howrah Shocker: महिलेने पतीला फसवून 10 लाखांना किडनी विकायला लावली, नंतर रोख रक्कम घेऊन प्रियकरासोबत पळाली; तक्रार दाखल)

घटनेवेळी शकील खान बिहारबाहेर होते. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रकरणाचा तपास सुरू केला असून एफएसएल टीमलाही पाचारण करण्यात आले आहे. या घटनेनंतर, पोलिस अधिकाऱ्यांनी तात्काळ मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

दरम्यान, या घटनेवर पूर्णियाचे खासदार पप्पू यादव शोक व्यक्त केला, "काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते माझे मित्र डॉ. शकील अहमद खान साहेब यांच्या मुलाचे अकाली निधन ही अत्यंत दुःखद बातमी आहे. शकील भाई आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या पूर्ण संवेदना आहेत.त्यांच्यासाठी सांत्वनाचे शब्द नाहीत. अल्लाहकडे प्रार्थना", अशी पोस्ट त्यांनी केली.