Tath Kana Poster: दिग्दर्शक गिरीश मोहिते दिग्दर्शित 'ताठ कणा' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, अभिनेता उमेश कामत दिसणार डॉ. रामाणी यांच्या भूमिकेत

ताठ कणा (Photo Credits- Instagram)

Tath Kana Poster:  सध्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मराठी सिनेसृष्टीतील सिनेमे अद्याप प्रदर्शित करण्यात आलेले नाही. मात्र आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला एक नवा सिनेमा येणार आहे. हा सिनेमा सत्य घटनांवर आधारित असून या मधील कथा ही डॉ. पी.एस. रामाणी यांच्या आयुष्याशी निगडीत आहे. तर प्लीफ सर्जरीमुळे (Plif Surgery)जगविख्यात झालेल्या डॉ. पी.एस, रामाणी  (De. P. S. Ramani) यांचे नाव, त्यांच्या संशोधनामुळे पाठीच्या कण्याशी कायमचे जोडले गेले आहे. पाठीच्या कण्यामधील एका दोषावर त्यांनी शोधून काढलेल्या उपायाने हजारो रूग्णांना आजवर वेदनामुक्त केले आहे.(Choricha Mamla: प्रियदर्शन जाधव चा 'चोरीचा मामला' हिंदीसह 5 भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये प्रदर्शित होणार तर 'चोरीचा मामला 2' ची तयारी सुरू)

तर 'पाठीचा कणा' या चित्रपटात अभिनेता उमेश कामत हा मुख्य भुमिकेत दिसून येणार आहे. त्याने या चित्रपटाचे पोस्टर त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. उमेश आता खुप दिवसानंतर पुन्हा एकदा चित्रपटातून झळकणार आहे. त्यामुळे आता चित्रपट कधी प्रदर्शित केला जाणार याची  सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. (Rinku Rajguru New Look: आर्ची फेम रिंकू राजगुरू चा आगामी चित्रपट 'छूमंतर' मधील नवा लूक आला समोर, लंडन मध्ये सुरु आहे चित्रीकरण)

 

View this post on Instagram

 

पाठीच्या कण्यावरील संशोधनातून जगविख्यात झालेल्या डॉ प्रेमानंद रामाणी यांच्या जीवनचरित्रावर आधारित "ताठकणा" @dr.p.s.ramani @girish_mohite @bojewarshrikant @deepti.devi @suyoggore @sayali_sanjeev_official @shaileshdatar @anupamatakmoge @shaileshparulekar @mudshingikar_vijay #tathkana #doctorslife #biography #worldspineday

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat) on

डॉ. रामाणी यांनी लहानपणापासूनच अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी झगडत विलक्षण कौशल्याने आणि बुद्धीने आपली वाटचाल केली. हे सर्व करत असताना रामाणी यांनी आपल्या सामाजिक दृष्टीचे भान जपत हजारो रुग्णांच्या वेदना ही कमी केल्या. अनेकांना जीवनदान दिले. त्यांचा हाच दृष्टीकोन ‘ताठ कणा’ या चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गिरीश मोहिते यांनी केले आहे. तसेच चित्रपटाच्या कथेचे लेखन श्रीकांत बोजेवार यांनी केले आहे. तर दिग्दर्शन गिरीश मोहिते यांनी केले आहे. त्याचसोबत प्रज्ञा क्रिएशन्स’चे विजय मुडशिंगीकर, व ‘स्प्रिंग समर फिल्मचे करण रावत यांनी ‘ताठ कणा’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे.