संतापजनक: HIV ग्रस्त पित्याचा आपल्या 10 वर्षांच्या मुलीवर अनेकदा बलात्कार; न्यायालयाने ठोठावली 4 वेळा जन्मठेपेची शिक्षा
इथल्या कोर्टाने मंगळवारी आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याबद्दल, दोषी असलेल्या एचआयव्ही (HIV) ग्रस्त 31 वर्षीय व्यक्तीस चार वेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे
तामिळनाडूच्या (TamilNadu) तंजावूर (Thanjavur) शहरात हादरवून ताकारणारे बलात्काराचे (Rape) प्रकरण समोर आले आहे. इथल्या कोर्टाने मंगळवारी आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याबद्दल, दोषी असलेल्या एचआयव्ही (HIV) ग्रस्त 31 वर्षीय व्यक्तीस चार वेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात प्राप्त झालेल्या वृत्तानुसार, महिला कोर्टाच्या न्यायाधीश एजहिलारसी यांनी कुमार याला चार वर्षांची जन्मठेपेची शिक्षा ठोठावली असून, त्यासोबतच त्याला मृत्यूपर्यंत तुरूंगातून सोडले जाणार नाही, असे स्पष्ट आदेशही दिले आहेत. त्याचबरोबर न्यायाधीशाने दोषीवर 4,500 रुपये दंड ठोठावला असून याव्यतिरिक्त, आपल्या मुलीला जिवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल त्याला सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली.
या प्रकरणात असे सांगण्यात आले आहे की, मुलीवर उपचार करण्याव्यतिरिक्त न्यायाधीशांनी राज्य सरकारकडून पाच लाख रुपये भरपाईचीही शिफारस केली आहे. जिल्ह्यातील मधुकरई येथे दैनंदिन मजुरी करणाऱ्या कुमार याने आपल्या दहा वर्षांच्या मुलीवर सतत बलात्कार केला. मीडिया रिपोर्टमध्ये कुमारला एचआयव्हीची लागण झाल्याचे सांगण्यात आले आहे. याआधी अनेकवेळा पित्याने आपल्या मुलीवर बलात्कार केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. सरकारने कडक कायदे करूनही अशा घटना थांबण्याचे नाव घेत नाहीस, हे पाहून समाजातील विकृतीची परिसीमा लक्षात येते.
(हेही वाचा- तलवारीचा धाक दाखवत आपल्या 5 मुलींवर वडिलांचा गेले 4 वर्षे बलात्कार; दोन लग्न झालेल्या मुलींवरही अत्याचार)
दरम्यान, नुकतेच ठाण्यातील तरुणाने स्वत:ला एचआयव्हीची लागण झाल्याची माहिती लपवून, ठेवून कामोठे भागात रहाणाऱ्या 26 वर्षीय तरुणीसोबत विवाह केला होता. त्यानंतर वर्षभरातच या तरुणीलादेखील एचआयव्हीची लागण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर हा तरुण व त्याच्या कुटुंबीयांवर फसवणुकीचा तसेच छळवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.