तमिळनाडू येथे 3.5 कोटींची इंन्शुरन्सची रक्कम मिळवण्यासाठी बायकोनेच नवऱ्याला जीवंत जाळले
तर एका 57 वर्षीय महिलेने चक्क आपल्या 62 वर्षीय जीवंत जाळल्याचा प्रकार घडला आहे. यामागील कारण म्हणजे नवऱ्याची इन्शुरन्सची 3.5 कोटींची रक्कम मिळवण्यासाठी महिलेने हे पाऊल उचलले आहे.
Tamil Nadu: तमिळनाडू येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तर एका 57 वर्षीय महिलेने चक्क आपल्या 62 वर्षीय जीवंत जाळल्याचा प्रकार घडला आहे. यामागील कारण म्हणजे नवऱ्याची इन्शुरन्सची 3.5 कोटींची रक्कम मिळवण्यासाठी महिलेने हे पाऊल उचलले आहे. महिलेने हा प्रकार तिच्या आणखी एका नातेवाईकासोबत मिळून केला असून आता पोलिसांकडून या दोघांना अटक करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, के. रंगराज असे मृताचे नाव असून ते ईरोडे जिल्ह्यातील थुडुपती येथे राहणारे होते. त्यांनी पॉवर लूम युनिट खरेदी केले होते. तर 15 मार्चला त्यांचा अपघात झाल्याने त्यांना कोईबंटुर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गुरुवारी त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला गेला आणि बायको आर. ज्योतीमणीसह नातेवाईक राजा आणि के. रानगराज हे एका गाडीत बसून घरी जाण्यासाठी निघाले.
टाइम्स ऑफ इंडियासोबत बातचीत करताना पोलीस अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, जेव्हा परुमन्नलूर येथे रात्री 1.30 वाजता पोहचले राजा याने गाडी थांबवली. राजा आणि ज्योतीमणी गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी गाडीवर पेट्रोल टाकत ती जाळली. यावेळी गाडीत रंगराज होते आणि त्यांना जीवंत जाळण्यात आले. तर शुक्रवारी पहाटे राजा याने पोलिसांना कळवले की त्यांचा अपघातात मृत्यू झाला आहे.(लखनौमध्ये बायकोने दारु पिण्यापासून अडवले असता नवऱ्याने केले आत्मदहन, मृत्यू)
मात्र राजाकडून दिलेल्या जाणाऱ्या या घटने प्रकरणातील प्रतिसादामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला. राजानेच पेट्रोल पंपावरुन कॅनमध्ये इंधन खरेदी केल्याचे पोलिसांना कळले. तर खात्री करुन घेण्यासाठी पोलिसांनी पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले असता त्यांना राजानेच ते घेतल्याचे दिसून आले. अखेर राजाने आपली चुक पोलिसांच्या समोर कबुल केली.(Bihar: मॉलमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; एका महिलेसह आरोपीला अटक)
पोलीस तपासात असे समोर आले आहे की, पोलिस चौकशीत असे स्पष्ट झाले आहे की रंगराज यांनी अनेक सावकारांकडून सुमारे दीड कोटी रुपये कर्ज घेतले होते. ते जोतिमानी यांना सतत पैशासाठी त्रास देत होते. तर रंगराज यांनी 3.5 कोटींची इन्शुरन्स काढले होते आणि त्यासाठी बायकोला नॉमिनी केले होते. त्यामुळेच ज्योतिमणी हिने रंगराज यांची हत्या करण्याचे ठरवले पण तो एक अपघात झाल्याचे त्यांना दाखवून द्यायचे होत. जेणेकरुन इंन्शुरन्सची रक्कम आपल्याला मिळेल असे बायकोला वाटले. त्यासाठी तिने राजाला या मध्ये मदत करण्यास गळ घातली आणि त्याने सुद्धा तिला होकार दिला. महिलेने राजाला 50 हजार रुपये अॅडवान्स मध्ये दिले होते. तर आणखी 1 लाख रुपये ती त्याला नंतर देणार होती. परंतु या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.