Tamil Nadu Shocker: बहिणीची हत्या करून तिच्या प्रियकराचा केला शिरच्छेद, आईचाही हात कापला; तामिळनाडूमधील ऑनर किलिंगची धक्कादायक घटना
मात्र, महालक्ष्मीचे पतीसोबतचे नाते फार काळ टिकू शकले नाही आणि तिला माहेरी परतावे लागले. गावात ती आई आणि भाऊ प्रवीणसोबत राहू लागली.
Tamil Nadu Honor Killing: तामिळनाडू (Tamil Nadu) येथून ऑनर किलिंगची (Honor Killing) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तिरुमंगलमजवळील कूडाकोइल येथे एका 22 वर्षीय तरुणाने मित्रांसह आपल्या बहिणीची हत्या करून तिच्या प्रियकराचा शिरच्छेद केला. नंतर त्याचे छिन्नविछिन्न डोके सार्वजनिकरित्या प्रदर्शित करण्यात आले. इतकेच नाही तर या व्यक्तीने आपल्या आईचा हातही कापला आहे. मदुराई जिल्ह्यातील तिरुमंगलमजवळील कुडाकोइल येथे मंगळवारी रात्री ही भीषण घटना घडली. प्रवीण कुमार (22) असे आरोपीचे नाव आहे. प्रवीणची बहिण महालक्ष्मी (25) हिचे स्थानिक रहिवाशी सतीश कुमार (28) सोबत प्रेमसंबंध होते. प्रवीणला या दोघांचे नाते मान्य आणि पसंत नव्हते व यावरून घरात सतत भांडणे होत असत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याआधी महालक्ष्मीचा विवाह मदुराई येथील वानियानकुलम येथील एका व्यक्तीशी झाला होता. मात्र, महालक्ष्मीचे पतीसोबतचे नाते फार काळ टिकू शकले नाही आणि तिला माहेरी परतावे लागले. गावात ती आई आणि भाऊ प्रवीणसोबत राहू लागली. या दरम्यान ती दुसऱ्या जातीतील सतीश कुमार माणसाच्या प्रेमात पडली. प्रवीण या नात्याला पूर्णपणे विरोधात होता. त्याने आपल्या बहिणीला आणि सतीशला हे संबंध संपवण्यबाबत बजावले होते. मात्र दोघांनी ऐकले नाही. (हेही वाचा: Karnataka Shocker: चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला 12 वर्षे घरात डांबून ठेवले; पोलिसांकडून सुटका, म्हैसूरमधील धक्कादायक घटना)
या रागातून मंगळवारी रात्री प्रवीण आणि त्याच्या मित्रांनी सतीशला वाटेत अडवून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले, परिणामी त्याचा मृत्यू झाला. प्रवीणने त्याचे शीर कापून सार्वजनिक ठिकाणी ठेवले. त्यानंतर त्याने घरी पोहोचून बहिणीची हत्या केली. जेव्हा आईने आपल्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने तिच्यावरही हल्ला केला आणि तिचा हात कापला. घटनेनंतर गावातील लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर महालक्ष्मी आणि सतीश कुमार या दोघांचेही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मदुराईच्या जीआरएच रुग्णालयात नेण्यात आले आहेत. पोलिसांनी चारपैकी तीन हल्लेखोरांना ताब्यात घेतले असून फरार संशयिताचा शोध सुरू आहे.