तमिळनाडू: शेती करुन मिळालेल्या शेकतऱ्याच्या पैशांवर पाणी, उंदराने कुरडतले 50 हजार रुपये
मात्र घरात ठेवलेले पैसे सुरक्षित असतील म्हणून तो पाहण्यासाठी गेला असता तर ती हजारो रुपयांची रक्कम उंदराने कुरडतल्याचा धक्कादायक प्रकार त्याला दिसला.
शेतीकाम हे फार कष्टाचे कामांपैकी एक मानले जाते. त्यामुळे शेतीची लागवड ते शेती मध्ये धान्य येईपर्यंत शेतकऱ्याला त्याची व्यवस्थित काळजी घ्यावी. त्यानंतर कुठे त्याच्या शेतीमधील पिकाला योग्य तो धान्य भाव दिला जातो. तर तमिळनाडू (Tamil Nadu) मधील शेतकऱ्याने ही खुप मेहनत करुन शेती मधील पिक विकले असता त्याला त्याचे पैसे मिळाले. मात्र घरात ठेवलेले पैसे सुरक्षित असतील म्हणून तो पाहण्यासाठी गेला असता तर ती हजारो रुपयांची रक्कम उंदराने कुरडतल्याचा धक्कादायक प्रकार त्याला दिसला.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, कोयंबटुर जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या रंगराज यांनी शेतातील पिक विकून 50 हजार रुपये जमा केले. पिकासाठी मिळालेले हे पैसे त्याने घरात ठेवले होते. मात्र काही कामानिमित्त ते पैसे घेण्यासाठी तो गेला असता तेव्हा बॅगमध्ये ठेवलेले पैसे उंदराने कुरतडले गेल्याचे पाहिले. यामध्ये 2 हजार आणि 500 रुपयांच्या नोटा कुरडतून ठेवल्या होत्या. मात्र हे पैसे घेऊन रंगराज बँकेत गेला असता त्यांनी कुरडतलेल्या बदल्यात दुसऱ्या नोटा देण्यास सांगितले. मात्र बँकेने पैसे देण्यास साफ नकार दिला. तर नोटा उंदराने कुरतडून खाल्ल्याने त्याच्या परिवारावर आर्थिक संकट आले आहे.(अमेरिका: अटलांटामध्ये रस्त्यावर पडला पैशांचा पाऊस; पैसे गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड Watch Video)
यापूर्वीसुद्धा आसाम मधील एका जिल्ह्यात खराब झालेल्या एटीएम मधील पैसे उंदराने कुरडतल्याचा प्रकार समोर आला होता. त्यावेळी 10 लाखांपेक्षा अधिक रक्कमेचे नुकसान झाले होते. एवढेच नाही तर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णाचे पाय सुद्धा उंदराने कुरडतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.