AI Track Elephant Movements: हत्तींच्या हालचाली टिपण्यासाठी Artificial Intelligence चा वापर; तामिळनाडू वन विभागाची माहिती
रेल्वे रुळ ओलांडताना धडक बसून होणाऱ्या हत्ती मृत्यूसाठी तामिळनाडू वन विभागाने (Tamil Nadu Forest Department) हायटेक पर्याय निवडला आहे. आता रुळ ओलांडणाऱ्या हत्तींच्या हालचाली टीपण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थातच आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर केला जाणार आहे. तामिळनाडू वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत समाजमाध्यमांवरुन माहिती दिली आहे.
Artificial Intelligence News: रेल्वे रुळ ओलांडताना धडक बसून होणाऱ्या हत्ती (Elephant ) मृत्यूसाठी तामिळनाडू वन विभागाने (Tamil Nadu Forest Department) हायटेक पर्याय निवडला आहे. आता रुळ ओलांडणाऱ्या हत्तींच्या हालचाली टीपण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थातच आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर केला जाणार आहे. तामिळनाडू वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत समाजमाध्यमांवरुन माहिती दिली आहे. अधिकऱ्यांनी म्हटले आहे की, कोईम्बतूरमधील मधुकराई येथे रेल्वे ट्रॅकवर हत्तींच्या हालचालींची नोंद करणे सुरू केले आहे. त्यासाठी तामिळनाडू वन विभागाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (IA) आधारित पाळत ठेवणारी यंत्रणा प्रायोगिक प्रकल्पाच्या आधारे स्थापन करण्यात आली आहे.
पर्यावरण हवामान बदल आणि वन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुप्रिया साहू यांनी सांगितले की, वनविभागाने प्रायोगिकत तत्वावर स्थापन करण्यात आलेल्या प्रणालीमध्ये 12 टॉवर्स आहेत. पाळत ठेवण्याच्या यंत्रणेमध्ये थर्मल आणि सामान्य दोन्ही कॅमेरे बसवलेले आहेत. जे प्राण्यांच्या हालचाली लवकर ओळखण्यासाठी रेल्वे ट्रॅकच्या बाजूला मोक्याच्या ठिकाणी लावण्या आले आहेत. तिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, "संवेदनशील डेटा साइटवर स्थापित केलेल्या नियंत्रण कक्षात स्वयंचलितपणे हस्तांतरित केला जातो. जो रिअल-टाइम आधारावर फील्डमधून गोळा केलेल्या डेटावर प्रक्रिया करतो आणि लोको पायलटना कॉल आणि एसएमएसद्वारे अलर्ट करतो.
या भागात गाड्यांच्या धडकेने हत्तींचे अनेक दुःखद मृत्यू झाले आहेत. आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे या टक्कर टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. जे अशा भागात हत्तींचे मृत्यू रोखण्यासाठी एक मोठे वरदान ठरू शकते, असेही सुप्रिया साहू यांनी एक व्हिडिओ पोस्ट करताना सांगितले.
AI, किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशिनमधील मानवी बुद्धिमत्तेच्या सिम्युलेशनचा संदर्भ देते. ज्यामुळे त्यांना सामान्यत: मानवी बुद्धिमत्तेची आवश्यकता असते अशी कार्ये करता येतात. या कार्यांमध्ये नैसर्गिक भाषा समजून घेणे, नमुने ओळखणे, समस्या सोडवणे, अनुभवातून शिकणे आणि निर्णय घेणे समाविष्ट आहे. एआय सिस्टम डेटाचे विश्लेषण करण्यासाठी, वेगवेगळ्या परिस्थितींशी जुळवून घेण्यासाठी आणि कालांतराने त्यांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.
AI कडे आरोग्य सेवा (निदान आणि उपचार नियोजन), वित्त (फसवणूक शोधणे आणि अल्गोरिदमिक ट्रेडिंग), स्वायत्त वाहने, ग्राहक सेवा (चॅटबॉट्स) आणि बरेच काही यासह विविध उद्योगांमध्ये अनुप्रयोगांची विस्तृत श्रेणी आहे. AI चे क्षेत्र सतत विकसित होत आहे आणि भविष्यात आपल्या दैनंदिन जीवनातील आणि उद्योगांच्या अनेक पैलूंना आकार देण्याची क्षमता आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)