Taiyo no Tamago आंब्याच्या सुरक्षेसाठी दोन सुरक्षा रक्षक, 3 कुत्रे
या आंब्यांच्या सुरक्षेसाठी त्यांनी 3 सुरक्षा रक्षक आणि तीन कुत्रे पाळले आहेत.
'ताईयो नो तामागो' (Taiyo no Tamago) हा आंबा जगभरात प्रसिद्ध आहे. या आंब्याला मिळणारी प्रसिद्धी केवळ त्याच्या गुणांमुळे नव्हे तर त्याला मिळणाऱ्या किमतीमुळेही आहे. जगभरात हा आंबा (Mango) लाखो रुपये किमतीला विकला जातो. त्याला मिळणारी किंमत पाहता त्याची चोरी होण्याची किंवा उत्सुकतेपोटी परिसरातील लोकांकडून खाल्ला जाण्याची मोठी शक्यता गृहीत धरुन उत्पादक चोख बंदोबस्त ठेवतात. मध्य प्रदेशातील जबलपूर येथील संकल्प परिहार 'ताईयो नो तामागो' आंब्याचं उत्पादन घेतात. या आंब्यांच्या सुरक्षेसाठी त्यांनी 3 सुरक्षा रक्षक आणि तीन कुत्रे पाळले आहेत.
सांगितले जाते की, बाजारात हा आंबा 2.30 लाख रुपयांच्या आसपास किमतीला विकला जातो असे सांगितले जाते. प्रामुख्याने या आंब्याचे उत्पादन जपानमध्ये घेतले जाते. परंतू, जबलपूर येथील शेतकऱ्याने हा आंबा पिकवला आहे. आंब्याचे महत्त्व लक्षात घेऊन त्याच्या सुरक्षेचीही काळजी घेतली जात आहे. 'ताईयो नो तामागो' आंब्याला 'एग्ज ऑफ सन' म्हणजेच सुर्याचे अंडे असेही म्हटले जाते. काही दिवसांपूर्वीच परिहार यांच्या आमराईतील आंब्याची चोरी झाली होती. तेव्हापासून त्यांनी बागेत सुरक्षारक्ष आणि श्वान तैनात केले आहेत.
पूर्णपणे परीपक्व झाल्यावर त्याचे वजन साधारण 900 ग्रँम इतके भरते. त्याचा रंग फिकट पिवळा आणि काहीसा लाल होत जातो. खायला अतिशय गोड असलेला हा आंबा प्रामुख्याने जपानच्या पॉलीहाऊसमध्ये पिकवला जातो. परिहार यांनी त्यांच्या शेतात उजाड जमीनीवर या आंब्याची शेती केली आहे. सद्यास्थितीत ते 14 प्रकारच्या विविध प्रजातींच्या आंब्याचे उत्पादन घेतात.