Swami Samarth Prakat Din 2023 Wishes: स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त Images, Photos शेअर करा मंगलमय करा स्वामीभक्तांचा आजचा दिवस!
स्वामीभक्तांसोबत स्वामी समर्थ प्रकटदिना निमित्त आपली आदरांजली अर्पण करण्यासाठी शेअर करा ही मराठमोळी शुभेच्छापत्रं
Swami Samarth Prakat Din 2023 Imagesमहाराष्ट्रामध्ये गुढी पाडवाचा (Gudi Padwa) सण साजरा केल्यानंतर दुसर्या दिवशी स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन (Swami Samarth Prakat Din) अनेक भाविक मोठ्या उत्साहात साजरा करतात. भाविकांच्या मान्यतेनुसार चैत्र शुद्ध द्वितीय या दिवशी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे दाखल झाले होते त्यामुळे हा त्यांचा प्रकट दिन असतो. यंदा ग्रेगेरियन कॅलेंडर नुसार, हा दिवस 23 मार्च गुरूवार दिवशी आहे. स्वामी समर्थ हे श्रीपाद वल्लभ व नृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार अवतार आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकटदिनानिमित्त स्वामींच्या मठात या दिवसाचे औचित्य साधत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मग या दिवसाचा आनंद तुमच्या स्वामी भक्त मित्रमंडळी, नातेवाईक, आप्तेष्ट यांच्यासोबतही WhatsApp Status, Images, Greetings शेअर करून द्विगुणित करू शकता.
स्वामी समर्थ हे दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे. स्वामी भक्तांना तो विविध रूपात अनुभवता आला. त्यांनी भाविकांना अनेक लीला दाखवल्या. ''भिऊ नकोस..मी तुझ्या पाठीशी आहे.'' या त्यांच्या अभिवचनावर विश्वास ठेवून आज अनेक स्वामी भक्त आयुष्याची वाट चालत आहेत. Swami Samartha Prakat Din: जाणून घ्या ऑन स्क्रिन स्वामी समर्थ यांची भूमिका साकारणारा अक्षय मुडावदकर बद्दल काही गोष्टी!
स्वामी समर्थ प्रकट दिन 2023 Wishes
अक्कलकोट येथे स्वामी समर्थ खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर पहिल्यांदा स्थानापन्न झाले. आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेकविध चमत्कार करून भाविकांना आपली प्रचिती दिली. गरीबातल्या गरीबापासून अगदी राजे, महाराजांपर्यंत त्यांचा भाविक वर्ग होता आणि सार्यांवरच त्यांनी प्रेमाचा वर्षाव केला.