उरी येथे आर्मी कॅम्पजवळ संशयास्पद हालचाली आढळल्याने लष्कराकडून शोधमोहीम सुरु

जम्मू -काश्मीर (Jammu-Kashmir) येथील उरी (URI) मध्ये लष्करी तळ असलेल्या ठिकाणी रविवारी रात्री संशयास्पद हालचाली आढळून आल्या आहेत.

भारतीय सेना (Photo Credit: PTI)

जम्मू -काश्मीर (Jammu-Kashmir) येथील उरी (URI) मध्ये लष्करी तळ असलेल्या ठिकाणी रविवारी रात्री संशयास्पद हालचाली आढळून आल्या आहेत. त्यामुळे लष्कराकडून गोळीबार करण्यात आल्यानंतर तेथे शोधमोहीम सुरु करण्यात आली आहे. तसेच मोहरा कॅम्पयेथे काही संशयित व्यक्तींच्या हाचलींमुळे तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांकडून गोळीबार करण्यात आला.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी आणि लष्करी सैन्यातील लोकांनी दोन संशयास्पद व्यक्तींना पाहिले असल्याचे सांगितले आहे. तसेच गोळीबार केल्यामुळे काही जणांना दुखापत होण्याची शक्यता आहे. तर पोलिसांकडून अद्याप या घटनेबाबत कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही.

तर यापूर्वू 18-19 सप्टेंबर 2016 रोजी झालेल्या उरीच्या भीषण हल्ल्यात 19 जवान शहीद झाले होते. तसेच उरी मधील या हल्ल्याची आठवण प्रत्येकाच्या मनाला चटका लावून जाणारी ठरली आहे.