राम नवमीच्या शोभा यात्रेत वादग्रस्त वकत्व्य करणाऱ्या भाजपच्या टी राजा विरोधात हैदराबादमध्ये गुन्हा दाखल

अफझलगंज पोलिस ठाण्यातील एसआय जे वीरा बाबू यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

MLA T Raja Singh | (File Image)

हैदराबादमध्ये रामनवमीच्या सभेत वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल पोलिसांनी भाजपचे निलंबित आमदार टी राजा सिंह यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अफजलगंज पोलिसांनी निलंबित भाजप आमदारावर भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 153-ए (धर्म, वंश, जन्मस्थान, निवासस्थान, भाषा इत्यादी कारणांवरून वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे) आणि 506 (धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल केला.

अफझलगंज पोलिस ठाण्यातील एसआय जे वीरा बाबू यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यांना भाजपच्या निलंबित आमदारांच्या परिसर असलेल्या एसए बाजार परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नियुक्त करण्यात आले होते. ते म्हणाले की, शंकर शेर हॉटेलजवळ रॅली असताना कॉन्स्टेबल किर्ती कुमार यांनी भाजप आमदाराचे द्वेषपूर्ण भाषण व्हिडिओ कॅमेऱ्यात रेकॉर्ड केले होते, ज्याने राजा सिंह यांच्यावर कारवाई करण्याची विनंती केली होती. एसएचओ एम रविंदर रेड्डी यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राजा सिंह यांची शोभा यात्रा रात्री 9 वाजता एसए बाजार येथे पोहोचली. हत्तीवर स्वार होऊन या राजकारण्याने हिंदीत भाषण केले. टी राजा सिंह, जे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात, त्यांनी हैदराबादमध्ये रामनवमीच्या उत्सवादरम्यान आणखी एक वाद निर्माण केला होता की भारत हिंदू राष्ट्र झाल्यास केवळ दोन अपत्य धोरणाचे पालन करणाऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळेल. आम्ही पाच, आमचे 50’ या धोरणाचे पालन करणाऱ्यांना मतदान करू दिले जाणार नाही असे त्यांनी म्हटले. टी राजा यांच्या विरोधात यापुर्वीही मुंबईत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या वर्षी जानेवारी महिन्यात सकळ हिंदू समाजाने काढलेल्या रॅलीत केलेल्या वक्तव्यविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.