सुषमा स्वराज यांच्या निधनाने भारताच्या एक तेजस्वी पर्वाचा अंत; नरेंद्र मोदी यांचे भावनिक ट्विट
भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री (External Affairs Minister) सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांचं मंगळवारी रात्री उशीरा दिल्लीच्या एम्स (AIIMS) रुग्णालयात निधन झालं. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.मागील पाच वर्षात सुषमा यांनी केलेल्या कामामुळे राजकीय वर्तुळाबाहेर सामान्य जनतेतही त्यांच्याबाद्ल निस्सीम आदर होता. त्यामुळे आज सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन, भारतीय राजकारणातलं एक तेजोमय पर्व संपलं अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या 5 वर्षांच्या कार्यकाळात स्वराज यांनी परराष्ट्र मंत्रालयाचा पदभार सांभाळला. भारताचं परदेश धोरण मजबूत करण्यामध्ये स्वराज यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी देशाबाहेर अडचणीत सापडलेल्या भारतीयांसाठी आपुलकीनेकेलेल्या अनेक महत्वाच्या कामांबद्दलही मोदींनी यावेळी सर्वांना आठवण करुन दिली. माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी निधनाच्या अवघ्या तीन तास आधी मानले होते नरेंद्र मोदी यांचे आभार
नरेंद्र मोदी ट्विट
याशिवाय राष्ट्रपती रामनाथ कोविंद व राहुल गांधी यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून सुषमा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. (Sushma Swaraj Best Speech: जेव्हा UN मध्ये सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानवर केला जोरदार 'हल्ला बोल', पहा हा व्हिडिओ)
रामनाथ कोविंद ट्विट
राहूल गांधी ट्विट
दरम्यान, सुषमा यांचे पार्थिव पुढील काही वेळातच र्त्यांच्या दिल्ली येथिल निवासस्थनी नेण्यात येणार आहे, आज रात्री हे पार्थिव त्यांच्या घरीच ठेवण्यात येणार आहे. उद्या दुपारी 3 च्या सुमारास भाजपच्या मुख्यालयात त्यांचे पार्थिव नेण्यात येईल त्यानंतर संध्याकाळी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार असल्याची माहिती जे पी नड्डा यांनी दिली आहे.