सुषमा स्वराज यांच्या जीवनात का होते रंगांना विशेष महत्व; जाणून घ्या 10 आश्चर्यकारक गोष्टी

त्यांचे स्पष्ट वक्तेपणामुळे आणि प्रभावी भाषणामुळे भल्याभल्यांना घाम फुटायचा. अशा या हरहुन्नरी ज्येष्ठ नेत्याविषयी जाणून घेऊया 20 आश्चर्यकारा गोष्टी:

Sushma Swaraj (Photo Credits: IANS)

आपल्या सडेतोड, स्पष्टवक्तेपणामुळे राजकीय वातावरणात स्वत:चे असे भक्कम स्थान निर्माण करणा-या भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांच्या निधनाने संपुर्ण राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. सुषमा स्वराज यांच्या अनपेक्षित एक्झिट हे कोणालाही पचण्यासारखी नव्हती. मंगळवारी रात्री त्यांच्या निधनाची बातमी ऐकताच कोणाचाही त्यावर विश्वास बसेना. धाडसी, प्रेमळ, कणखर असे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जाण्याने भारताच्या एका तेजस्वी पर्वाचा अंत झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटमधून म्हटले आहे.

राजकीय वर्तुळात सुषमा स्वराज यांचा कायमचा दबदबा असायचा. त्यांचे स्पष्ट वक्तेपणामुळे आणि प्रभावी भाषणामुळे भल्याभल्यांना घाम फुटायचा. अशा या हरहुन्नरी ज्येष्ठ नेत्याविषयी जाणून घेऊया 10 आश्चर्यकारक गोष्टी:

1. इंदिरा गांधी नंतर सुषमा स्वराज या भारतातील दुस-या महिला होत्या ज्यांनी परराष्ट्र मंत्रिपदाचा पदभार स्विकारला.

2. सुषमा स्वराज या दिल्लीच्या 5 व्या मुख्यमंत्री होत्या. दिल्लीच्या गादीवर महिला मुख्यमंत्री पदाचा मान पटकाविणा-या त्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या.

3. वयाच्या 25 व्या वर्षी हरयाणाच्या कॅबिनेट मंत्रीपदी त्यांची निवड झाली होती. या पदावर विराजमान झालेल्या त्या हरयाणाच्या सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री होत्या.

4. त्या 7 वेळा खासदारपदी आणि 3 वेळा आमदारपदी निवडून आल्या होत्या.

5. महाविद्यालयीन जीवनात 3 वर्षासाठी सर्वोत्कृष्ट एनसीसी कॅडेट म्हणून त्यांची निवड झाली होती.

6. सुषमा स्वराज यांनी 1970 साली आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांच्या सार्वजनिक ठिकाणी प्रभावीशाली केलेल्या वक्तृत्वामुळे, खंबीर नेतृत्व या गुणांमुळे 1970 साली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्या.

7. Law चे शिक्षण पुर्ण करुन 1973 मध्ये सुप्रीम कोर्टात वकील म्हणून सराव सुरु केला.

हेही वाचा- भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यावर आज दुपारी 3 वाजता होणार अंत्यसंस्कार

8. त्यांचा ज्योतिषशास्त्र आणि रत्नशास्त्रावर प्रचंड विश्वास होता आणि त्याबाबत ज्ञानही होते. त्या आधारावर त्यांचे खाणे, पिणे, त्यांचा पेहराव त्याचा रंग ठरत असे. उदा. प्रत्येक सोमवारी त्या पांढ-या रंगाची साडी नेसायच्या आणि पांढ-या रंगाचे पदार्थ खायच्या. त्याचे कारण सोमवारी चंद्राचा प्रभाव असतो आणि मोती खड्याला त्या दिवशी महत्व असते असे त्यामागचे कारण होते. अन्य दिवशीही ज्योतिषशास्त्र आणि रत्नशास्त्रावर आपल्या दैनंदिन आयुष्यात त्या रंगसंगती करायच्या.

9. त्या सोशल मिडियावरील सक्रिय असलेल्या ज्येष्ठ महिला नेत्या होत्या. त्यांनी आतापर्यंत आपल्या ट्विटरव अकाउंटवरील एकूण-एक ट्विट ला प्रतिसाद दिला आहे. ज्याच्या आकडा हा नक्कीच मोजता येणारा नव्हे. त्याच्या या वागणुकीमुळे सामान्य लोकांच्या मनात त्यांच्याविषयी खूप आदर होता.

10. त्यांना वेद के गोलगप्पे, कालका वाले की कचौरी, शेंगदाणे, घरातील लोणीने बनवलेले आलू के पराठे त्यांच्या आवडीचे होते. त्या जेव्हा आपल्या मूळ गावी म्हणजेच अम्बाला ला जायच्या तेव्हा हे पदार्थ त्या आवर्जून खायच्या.

सुषमा स्वराज यांनी राजकीय कारकिर्दीसोबत आपल्या घराची आणि कुटूंबाची जबाबदारीही सक्षमपणे पेलली होती. या सर्वात त्यांचे पती स्वराज कौशल यांनी मोलाची साथ दिली. 13 जुलै 1973 मध्ये हे दोघे विवाहबद्ध झाले. सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरीने ऑक्सफर्ड युनिर्वसिटीमधून लॉ चे शिक्षण घेतले. थोडक्यात सांगायचे झाले राजकारणासह आपल्या वैयक्तिक आयुष्यातही सुषमा स्वराज यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि त्यांची कामगिरी खरंच वाखाखण्याजोगी होती. अशा या हरहुन्नरी नेत्याला सुषमा स्वराज यांना लेटेस्टली कडून भावपूर्ण श्रद्धांजली.