Surya Grahan 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोझीकोड येथून आपल्या खास अंदाजात पाहिले कंकणाकृती सूर्य ग्रहण, पाहा फोटो

दुर्दैवाने आकाश ढगाळ असल्याने सूर्य ग्रहण पाहू शकलो नाही. परंतू मी कोझीकोड आणि इतर भागांमध्ये सूर्य ग्रहणाची झलक लाईव्ह स्ट्रीम रुपात पाहिली.

Prime Minister Narendra Modi Also Saw The Solar Eclipse | (Photo Credit: Twitter)

आंतराळातील चांद्र मोहीम असो की सूर्य ग्रहण (Solar Eclips) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) हे पृथ्वी आणि आंतराळातील सर्वच गोष्टींवर बारीक नजर ठेऊन असतात. जगभरातील वैज्ञानिकांचा आणि अभ्यासकांच्या कुतुहलाचा तर सर्वसामान्य नागरिकांच्या आकर्षणाचा विषय ठरलेल्या सूर्य ग्रहण 2019 (Solar Eclipse 2019 ) वरही पंतप्रधान मोदी नजर ठेऊन होते. त्यानुसार त्यांनी गुरुवारी (26 डिसेंबर 2019) सूर्य ग्रहण पाहिले. सूर्य ग्रहण पाहतानाची छायाचित्रेही पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केली आहेत.

सूर्य ग्रहणावर पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केले आहे की, 'असंख्य भारतीयांप्रमाणे मीसुद्धा सूर्यग्रहण 2019 बद्दल उत्साही होतो. दुर्दैवाने आकाश ढगाळ असल्याने सूर्य ग्रहण पाहू शकलो नाही. परंतू मी कोझीकोड आणि इतर भागांमध्ये सूर्य ग्रहणाची झलक लाईव्ह स्ट्रीम रुपात पाहिली. या वेळी अभ्यासक आणि संशोधकांसोबत चर्चा करुन मी माझे ज्ञान अधिक समृद्ध केले.' (हेही वाचा, Surya Grahan 2019: सूर्यग्रहण सुतक काळ संपल्यानंतर दोष टाळण्यासाठी अवश्य केल्या जातात 'या' गोष्टी!)

पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट

दरम्यान, गुरुवारी दिसत असलेले सूर्य ग्रहण सौदी अरब, कतार, संयुक्त अरब अमीरात, ओमान, भारत, श्रीलंका, मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापुर, उत्तरी मारियाना द्वीप आणि गुआम येथे पाहायला मिळाले. दरम्यान, हे पूर्ण सूर्य ग्रहण म्हणजेच खग्रास सूर्य ग्रहण नाही. तर, हे कंकणाकृती सूर्यग्रहण आहे. काही ठिकाही हे सूर्यग्रहण खंडग्रास रुपातही पाहायला मिळाले आहे. भारतात सकाळी 8 वाजून 4 मिनिटांनी ग्रहण सुरु झाले. या सूर्य ग्रहणाला संशोधकांनी 'रिंग ऑफ फायर' असे नाव दिले आहे.