Bargari Sacrilege Cases: डेरा सच्चा सौदा प्रमुख Gurmeet Ram Rahim यास सर्वोच्च न्यायालया दणका; धार्मिक ग्रंथ अदनार प्रकरणी चौकशीचे आदेश
सर्वोच्च न्यायालयाने 2015 च्या बरगारी अपवित्र प्रकरणातील गुरमीत राम रहीम सिंगच्या खटल्यावरील स्थगिती उठवली आहे, ज्यामुळे खटला चालवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बलात्काराच्या आरोपाखाली राम रहीम आधीच 20 वर्षांची शिक्षा भोगत आहे.
वादग्रस्त डेरा सच्चा सौदा (Dera Sacha Sauda) प्रमुख गुरमीत राम रहीम (Gurmeet Ram Rahim) यांच्याविरोधातील खटल्याच्या सुनावणीस पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) उठवली आहे. या प्रकरणांमध्ये शीख समुदायाचा पवित्र ग्रंथ असलेल्या गुरु ग्रंथ साहिबच्या (Guru Granth Sahib) कथित अनादर केल्याचा समावेश आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने मार्च महिन्यात डेरा प्रमुखांवरील झालेले आरोप आणि या प्रसरणात दाखल तीन प्रकरणांच्या चौकशीस स्थगिती दिली होती. या स्थगितीविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. न्यायमूर्ती B.R. गवई आणि K.V. विश्वनाथन यांनी तीनही प्रकरणात खटल्याला स्थगिती देणारा न्यायालयीन अडथळा दूर करत हा आदेश जारी केला. न्यायालयाने दोषीला नोटीसही बजावली असून त्याला चार आठवड्यांत उत्तर सादर करण्यास सांगितले आहे.
काय आहे Bargari Sacrilege प्रकरण?
बरगारी अपवित्रतेच्या घटना 2015 मध्ये पंजाबच्या फरीदकोट जिल्ह्यात घडल्या, जिथे गुरु ग्रंथ साहिबच्या प्रती गायब झाल्याचा प्रकार पुढे आल्याने आणि त्याचा अनादर झाल्याचा कथीत प्रकार पुढे आल्यानंतर शीख समाजात असंतोष निर्माण झाला. ज्यामुळे निदर्शने झाली. दरम्यान, गुरमीत राम रहीम बलात्कार आणि हत्येप्रकरणी आधीच दोषी ठरलेला राम रहीम आता या अपवित्र प्रकरणांमध्ये अडकला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने अपवित्रतेच्या प्रकरणांमध्ये स्वयंघोषित धर्मगुरूविरुद्धच्या कारवाईला स्थगिती दिली होती. मार्च 2024 मध्ये जारी करण्यात आलेल्या स्थगिती आदेशामुळे या प्रकरणांमध्ये पुढील तपास किंवा खटला थांबवण्यात आला होता. (हेही वाचा, New Justice Statue In Supreme Court: न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली, हातात तलवारीच्या जागी संविधान; सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तींचा नवा पुतळा)
पंजाब सरकारसमोर आव्हान
शीख धर्मग्रंथांच्या अपवित्रतेसाठी न्याय मागणाऱ्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला पंजाब सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालय द्वारा देण्यात आलेला आजचा निर्णय राम रहीमसाठी एक मोठा धक्का आहे, कारण यामुळे खटल्यांची सुनावणी पुढे जाऊ शकते. (हेही वाचा -Gurmeet Ram Rahim Gets Parole Again: डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग यास पॅरोल मंजूर; बलात्कार, हत्या प्रकरणात भोगतोय तुरुंगवास)
राम रहीम बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात
बलात्काराच्या आरोपाखाली आधीच 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेल्या आणि हत्येसाठीही दोषी ठरलेल्या राम रहीमला आता अतिरिक्त कायदेशीर आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. अपवित्रतेच्या खटल्याची सुनावणी पुन्हा सुरू होणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे 2015 च्या अपवित्रतेच्या घटनांकडे नव्याने लक्ष वेधले जाण्याची शक्यता आहे.
कायदेशीर आणि सामाजिक परिणाम
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे शीख समाजातील अनेकांनी स्वागत केले आहे, ज्यांनी बऱ्याच काळापासून कथीत अनादराच्या प्रकरणांमध्ये न्यायाची मागणी केली आहे. गुरु ग्रंथ साहिबची विटंबना हा एक संवेदनशील मुद्दा राहिला आहे आणि आजच्या निर्णयाकडे जबाबदारीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जाते. दरम्यान, या प्रकरणात सुनावनीचा पुढचा टप्पा येत्या काही महिन्यांत होण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये गुरमीत राम रहीमला आरोपांना उत्तर देणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे कायदेशीर प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)