Sun Pharma Recalls Generic Drug: सन फार्मा कंपनीने अमेरिकेतून परत मागवल्या जेनेरिक औषधांच्या 34,000 पेक्षा अधिक बाटल्या, चाचणीत नापास झाल्याने निर्णय
औषध क्षेत्रातील प्रमुख सन फार्मा (Sun Pharma) कंपनी जेनेरिक औषधाच्या 34,000 हून अधिक बाटल्या अमेरिकेतून परत मागवल्या आहेत. परत मागवलेली जवळपास सर्वच सर्व औषधे उच्च रक्तदाबावर उपचार करण्यासाठी वापरली जातात. सदर औषधे चाचणीमध्ये बाद ठरल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
औषध क्षेत्रातील प्रमुख सन फार्मा (Sun Pharma) कंपनी जेनेरिक औषधाच्या 34,000 हून अधिक बाटल्या अमेरिकेतून परत मागवल्या आहेत. परत मागवलेली जवळपास सर्वच सर्व औषधे उच्च रक्तदाबावर उपचार करण्यासाठी वापरली जातात. सदर औषधे चाचणीमध्ये बाद ठरल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. प्रसारमाध्यमांनी यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनच्या अंमलबजावणी (US Food and Drug Administration's Enforcement Report) अहवालाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे क, सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजची यूएस-आधारित शाखा अनेक डिल्टियाजेम हायड्रोक्लोराइड (Diltiazem Hydrochloride) विस्तारित-रिलीझ कॅप्सूल परत मागवत आहे. ज्याचा वापर एनजाइना, उच्च रक्तदाब आणि काही प्रकारचे हृदयाचे अनियमित ठोके यावर उपचार करण्यासाठी केला जातो.
न्यू जर्सी येथील प्रिन्स्टन स्थित सन फार्मास्युटिकल कंपनीचे औषध स्थिरता चाचणी दरम्यान आवश्यक मापदंड (डीसेटाइल डिल्टियाझेम हायड्रोक्लोराइड) पूर्ण करण्यात आणि एफडीए प्रयोगशाळेत विघटन चाचणी अयशस्वी ठरले. परिणामी कंपनीने ही संपूर्ण बॅचच परत मागवली. मुंबईस्थित सन फार्मा ड्रग कंपनीने गुजरातमधील हलोल-आधारित उत्पादन केंद्रात हे लॉट तयार केले होते. जे यूएस-आधारित युनिटद्वारे बाजारात वितरित केले गेले. (हेही वाचा, Cancer Medicine, Paracetamol सह अनेक अत्यावश्यक औषधांच्या किंमतीमध्ये पुन्हा घट; इथे पहा स्वस्त झालेल्या औषधांची किंमतीसह यादी)
USFDA ने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा एखादे उत्पादन शुद्धता आणि परिणामकतेचे विशिष्ठ मापदंड पूर्ण करत नाही.ज्यामुळे मानवी आरोग्य अथवा वापरकर्त्याचे हित धोक्यात येते, वैद्यकीयदृष्ट्या हानीकारक ठरते, अशा वेळी संबंधित औषधांची बॅच परत पाठवली जाते किंवा त्या कंपनीला ते उद्पादन परत घ्यावे लागते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)