भारतीय वायुसेनेची ताकद वाढली; 8 सर्वात खतरनाक हेलिकॉप्टर्स हवाई दलात सामील, जाणून घ्या वैशिष्ट्ये (Video)

भारतीय वायुसेनेते (Indian Air Force) आठ अपाचे एएच-64 ई (Apache AH-64E) लढाऊ हेलिकॉप्टर्स दाखल झाली आहेत. ही सर्व हेलिकॉप्टर्स अमेरिकेकडून मागवण्यात आली आहेत. आज हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांच्या उपस्थितीत पठाणकोट येथे या हेलिकॉप्टर्सना हवाई दलात स्थान देण्यात आले

Apache Attack Helicopters (Photo Credits: ANI)

गेले काही महिने भारत आणि पाकिस्तान या देशांमधील तणाव प्रचंड वाढला आहे. काश्मीर मुद्द्यावरून आक्रमक झालेला पाकिस्तान कुरघोड्या करण्याची एकही संधी सोडत नाही. हे पाहून भारताने आपल्या तीनही दलांचे सामर्थ्य वाढवण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय वायुसेनेते (Indian Air Force) आठ अपाचे एएच-64 ई  (Apache AH-64E) लढाऊ हेलिकॉप्टर्स दाखल झाली आहेत. ही सर्व हेलिकॉप्टर्स अमेरिकेकडून मागवण्यात आली आहेत. आज हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांच्या उपस्थितीत पठाणकोट येथे या हेलिकॉप्टर्सना हवाई दलात स्थान देण्यात आले.

एएनआय ट्विट - 

ही हेलिकॉप्टर्स जगातील सर्वात भयंकर हल्ल्यासाठी वापरता येतात. ही हेलिकॉप्टर्स मिळणेबाबत  2015 साली भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये 4168 कोटी रुपयांचा करार झाला होता. या करारानुसार भरताना अशा प्रकारची एकूण 22 हेलिकॉप्टर्स मिळणार आहेत. त्यापैकी 4 हेलिकॉप्टरचा पुरवठा पहिल्या टप्प्यात म्हणजेच 27 जुलै रोजी करण्यात आला होता.

#WATCH Punjab: The Apache chopper receives water cannon salute, before induction at the Pathankot Air Base. pic.twitter.com/YNT49rjr3B

वैशिष्ट्ये –

  • हे हेलिकॉप्टर कोणत्याही लष्करी कारवाईसाठी नाही तर हल्ल्यासाठी किंवा युद्धासाठी वापरण्यात येते. (हेही वाचा: भारतीय वायुसेनेने लॉन्च केला 'Indian Air Force: A Cut Above' स्मार्टफोन गेम; असा करा डाऊनलोड)
  • रात्रीसुद्धा हे हेलिकॉप्टर 293 किमी प्रति तासाच्या वेगाने उडू शकते
  • AH-64E मध्ये 30 एमएमची M230 ऑटोमॅटिक गन आहे. ज्यामधून 1200 राउंड फायरिंग केली जाऊ शकते.
  • अमेरिकेने इराण आणि तालिबानच्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी याच हेलिकॉप्टरचा वापर केला होता.
  • हा हेलिकॉप्टरमध्ये सर्व अत्याधुनिक सोयी उपलब्ध आहेत. ज्यामुळे डोंगराळ भागात लपून बसलेल्या शत्रूचा शोध लागू शकतो.
  • सर्वात महत्वाचे म्हणजे हे हेलिकॉप्टर त्याच्या डिझाईनमुळे रडारमध्ये दिसत नाही. त्यामुळे शत्रूच्या गोटात जाऊन त्यांच्यावर हल्ला करणे सोपे ठरते.

तर अशा या हेलिकॉप्टरमुळे भारताची ताकद प्रचंड वाढली आहे. सध्या  अमेरिका, भारत शिवाय नेदरलॅंड्स, इजिप्त, इस्राइलच्या ताफ्यातही अपाचे विमाने आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now