Stock Market: शेअर बाजार 2,700 अंकांनी कोसळला; लोकसभा निवडणूक ट्रेंड Sensex,Nifty साठी निराशाजनक
बाजार सुरु झाला तेव्हा बीएसई सेन्सेक्स (Sensex) 2,700 अंकांनी घसरून 73,844 वर आला आणि एनएसई निफ्टी (Nifty) 769 अंकांनी घसरून 22,494 वर आला. भारतीय सार्वत्रिक निवडणूक निकाल (General Election Result 2024) जाहीर होत आहेत.
भारतीय शेअर बाजार (Indian Stock Market) आज (4 जून) आज मोठ्या प्रमाणावर कोसळला. बाजार सुरु झाला तेव्हा बीएसई सेन्सेक्स (Sensex) 2,700 अंकांनी घसरून 73,844 वर आला आणि एनएसई निफ्टी (Nifty) 769 अंकांनी घसरून 22,494 वर आला. भारतीय सार्वत्रिक निवडणूक निकाल (General Election Result 2024) जाहीर होत आहेत. अद्याप कोणत्याही जागेवरील अंतिम निकाल जाहीर झाला नसला तरी प्राथमिक कल हाती येत आहेत. हे कल विद्यमान केंद्र सरकारसाठी दिलासादयक नाहीत. त्याचा जोरदार परिणाम शेअर बाजारावर झाला. एक्झिट पोल्सच्या अंदाजांमध्ये भाजप प्रणित NDA 400 पार करेल असे म्हटले होते. मात्र, सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये ट्रेंडने पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील NDA 400 जागांच्या अंदाजाजवळ पोहोचताना दिसत नाहीत.
गुंतवणूकदारांचे 14 लाख कोटी रुपयांचे नुकसान:
शेअर बाजार कोसळल्यामुळे गुंतवणुकदारांना मोठा झटका बसला. गुंतवणूकदारांची संपत्ती 14.27 लाख कोटी रुपयांनी घसरून 411.64 लाख कोटी रुपयांवर आली आहे. जी मागील सत्रातील 425.91 लाख कोटी रुपयांवरून खाली आली आहे. L&T, PowerGrid, SBI, Reliance, NTPC आणि HDFC बँक मध्ये मोठ्या तोट्यासह सर्व सेन्सेक्स समभाग लाल रंगात व्यवहार करत होते, जे सुरुवातीच्या सौद्यांमध्ये 4.86% पर्यंत घसरले. (हेही वाचा, Exit Polls And Stock Market Chronology: शेअर मार्केट क्रोनोलॉजी वास्तवात? अखिलेश यादव यांनी एग्झिट पोल निकालानंतर केले होते भाकीत)
52-आठवड्यातील उच्च आणि नीचांक गाठणारे स्टॉक:
एकूण 63 समभागांनी त्यांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर, तर 48 समभागांनी सुरुवातीच्या व्यवहारात बीएसईवर त्यांच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळी गाठली. (हेही वाचा, Stock Market Crash: मतमोजणीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमुळे शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 2500 अंकांनी घसरला)
बाजार लाल रंगात रंगला
2,889 समभागांपैकी 703 समभाग हिरव्या रंगात व्यवहार करत होते. सुमारे 2,065 समभाग लाल रंगात होते, तर 121 समभाग अपरिवर्तित राहिले.
क्षेत्रीय निर्देशांकांचे नुकसान:
बीएसईवरील सर्व 19 क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात होते. कॅपिटल गुड्स, बँकिंग आणि ऑटो शेअर्समुळे दलाल स्ट्रीटवर तोटा झाला. BSE भांडवली वस्तू निर्देशांक 3,257 अंकांनी घसरला, बँकेक्स 1,874 अंकांनी घसरला आणि ऑटो निर्देशांक 1,297 अंकांनी घसरला.
अप्पर आणि लोअर सर्किट्स:
सकाळच्या सत्रात सुमारे 57 समभागांनी त्यांच्या अप्पर सर्किट मर्यादेपर्यंत मजल मारली, तर 102 समभागांनी त्यांच्या लोअर सर्किट मर्यादा गाठल्या.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक कोसळले:
बीएसई मिडकॅप निर्देशांक 1,383 अंकांनी घसरून 42,984 वर आला, ज्यामुळे व्यापक बाजारात मंदीचे संकेत मिळाले. स्मॉलकॅप निर्देशांक 1,485 अंकांनी घसरून 46,746 वर आला.
मागील सत्राचा आढावा:
मागील सत्रात सेन्सेक्स 2,507 अंकांनी वाढून 76,468 वर बंद झाला आणि निफ्टी 733 अंकांनी वाढून 23,263 वर बंद झाला. 31 मे रोजीच्या सत्रातील 412.12 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत गुंतवणूकदारांची संपत्ती 13.79 लाख कोटी रुपयांनी वाढून 425.91 लाख कोटी रुपये झाली आहे.