Sonia Gandhi On Why Rajya Sabha: लोकसभा नाही, राज्यसभाच का? सानिया गांधी यांनी सांगितले कारण
याबात स्वत: सोनिया गांधी यांनीच माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, प्रकृतीच्या कारणास्तव आपण आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या (Congress) प्रमुख नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी राजस्थानमधून राज्यसभा (Rajya Sabha निवडणुकीसाठी निवडणूक अर्ज दाखल केला. पाठिमागील जवळपास पाच टर्म रायबरेली येथून लोकसभेवर खासदार राहिलेल्या सोनिया गांधी यांनी अचानक संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेवर जाणे का पसंत केले. याबात स्वत: सोनिया गांधी यांनीच माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, प्रकृतीच्या कारणास्तव आपण आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही.
'लोककल्याणासाठी कायम वचनबद्ध'
सोनिया गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थकांना संबोधित करताना सांगितले की, केवळ प्रकृती आणि वाढलेले वय यामुळेच आपण लोकसभा निवडणुकीत उमेदवारी करणार नाही. तरीही आपण लोकांची कामे आणि कल्याणासाठी कायम वचनबद्ध आहोत. राज्यसभेच्या माध्यमातून आपण लोकसेवा करु असे त्यांनी म्हटले आहे. पक्षाने दिलेल्या संधीबद्धलही त्यांनी आभार मानले.
सोनिया गांधी यांचे रायबरेलीच्या जनतेला उद्देशून पत्र
सोनिया गांधी यांचा राजकीय प्रवास 1999 मध्ये अमेठीमधून खासदार म्हणून निवडून आल्यापासून सुरू झाला. लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधक म्हणूनही त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी निभावली. सन 2004 मध्ये त्यांनी रायबरेली या मतदारसंघातून विजय मिळवला. रायबरेली मतदारसंघाचा गांधी कुटुंबाशी ऐतिहासिक संबंध आहे. रायबरेलीच्या जनतेला लिहिलेल्या पत्रात, सोनिया गांधींनी त्यांच्या कुटुंबाचा मतदारसंघाशी असलेला सखोल अधोरेखीत केला. त्यांनी सासरे फिरोज गांधी आणि सासू इंदिरा गांधी यांचा वारसा सांगितला. या दोघांनीही रायबरेली मतदारसंघातून प्रतिनिधीत्व केले होते. (हेही वाचा, Sonia Gandhi To File Nomination For Rajya Sabha: सोनिया गांधी राज्यसभेसाठी राजस्थान येथून आज भरणार निवडणूक अर्ज)
रायबरेलीतील जनता काँग्रेस आणि गांधी कुटुंबाच्या पाठीशी ठाम
देशभरामध्ये काँग्रेसला अनेक ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला. असा वेळी रायबरेलीतील जनता मात्र या नेहमीच काँग्रेस आणि गांधी कुटुंबाच्या पाठी ठाम राहिली. आव्हानात्मक काळात सोबत राहिल्याबद्दल सोनिया गांधी यांनी रायबरेलीच्या जनतेचे आभार मानले. त्यांच्या अतुलनीय पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. दरम्यान, सोनिया गांधी रायबरेली आणि लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून बाजूला जात आहेत. दरम्यान, त्यांच्या कन्या प्रियंका गांधी वड्रा 2024 च्या निवडणुकीत संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोनिया गांधी यांचा निर्णय काँग्रेस पक्षासाठी अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरेल, असे राजकीय भाष्कारांचे मत आहे. (हेही वाचा, Rajya Sabha Election 2024: काँग्रेस कडून चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर)
सोनिया गांधी यांनी राहुल गांधी आणि प्रियंका यांच्या उपस्थिती राजस्थान येथील जयपूर येथे राज्यसभा निवडणुकीसाठी निवडणूक अर्ज दाखल केला. या वेळी काँग्रेस नेते राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासह इतरही काही मंडळी उपस्थित होती. सोनिया गांधी प्रथमच राज्यसभा सभागृहात जाणार आहेत. त्यांच्या विजयाबद्दल काँग्रेसला खात्री आहे आणि पक्षाकडे आवश्यक मतेही आहेत.