IPL Auction 2025 Live

Social Media Fraud: फेसबुकवर मैत्री केल्यानंतर महिलेला घातला 2.5 कोटी रुपयांचा गंडा

त्यानंतर तिच्याकडून अडीच लाख रुपये उकळल्याचा आरोप करत एका व्यक्तिला अटक केली आहे.

Arrested

Social Media Fraud: राजस्थान पोलिसंनी एका महिलेकडून विदेशी महिला असल्याचे नाटक करत फेसबुकवर मैत्री केली. त्यानंतर तिच्याकडून अडीच लाख रुपये उकळल्याचा आरोप करत एका व्यक्तिला अटक केली आहे. रविवारी अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची ओळख नीरज सूरी अशी पटली आहे. तो बिहार येथे राहणारा आहे. पोलिसांच्या मते त्याने फेसबुकवर रेबेका क्रिस्टीन नावाची विदेशी महिला असल्याचे सांगत फसवणूक केली आहे. रेबेका सवाई माधोपुर स्थित गुंजन शर्मा हिची मैत्री तिच्यासोबत झाली. फेसबुकवरील फ्रेंडने असे म्हटले की, ती विधवा असून तिला कॅन्सर झाला आहे. तिची 28 कोटी रुपयांची संपत्ती आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी पुढे असे म्हटले की, त्या फेसबुकवरील फ्रेंडने तिच्या संपत्तीचे कोणच वारिस नसल्याचे म्हटले. यामुळेच तिला ती गुंजन हिला द्यायची असल्याचे तिने ठरवले.(स्वयंघोषित बाबाचा प्रताप; पाच विवाह, भावाच्या पत्नीवर बलात्कार व 32 मुलींशी चॅटिंग सुरु असताना सहाव्या लग्नाची तयारी, पोलिसांकडून अटक)

आरोपीने पुढे पीडितेला असे म्हटले की, तिचा वकील बरमेक्स आणि एक भारतीय प्रतिनीधी बॅन जॉनसन पुढील काही गोष्टींसाठी तिला संपर्क करतील. त्यानंतर गुंजन हिला विदेशी मुद्रा विभागातून एक ईमेल आला. त्यानंतर कस्टम कार्यलयाच्या द्वारे जप्त करण्यात आलेल्या महागाच्या वस्तूंवर लावण्यात आलेल्या दंडाच्या नावावर याबद्दल सांगितले होते. त्यानुसार 2.5 कोटी रुपये सुद्धा भरले. मात्र जेव्हा गुंजन हिला कळले की, आपली फसवणूक झाली तेव्हा तिने पोलिसात तक्रार दाखल केली.

पोलीस उपमहानिरिक्षक एसओजी शरत कविराज यांनी आपल्या टीमसह खात्यांच्या आधारावर तपास लावला आणि आरोपीला मसूरी आणि देहरादून मध्ये सुरु असलेल्या त्याच्या कार्यालयातून अटक केली. तपासात असे समोर आले की. आरोपीने बनावट कार्डाचा वापर करुन काम करत होता. त्याने जीएसटी, आयटीआर, पॅन कार्ड, आधार कार्डचा उपयोग करत कर्ज मिळवण्यासाठी आणि खोटे खाते सुरु करण्यासाठी त्याने दिल्ली, मसूरी आणि देहरादून मध्ये कार्यालये सुरु केली होती.

काही नायजेरियन नागरिकांसह काम करत होता आणि त्यांची बनावट खाती सुरु करत अधिक कमीशन मिळावे असा त्याचा उद्देष होता. आरोपी बनावट ओळख निर्माण करुन फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवून नायजेरियन परदेशी नागरिकांसोबत गँगरेप करत होता आणि त्यामागे त्यांना मोठी रक्कम देऊ करेन असे ही सांगत त्यांची लूट करायचा.

पोलिसांच्या अटकेपासून बचाव करण्यासाठी आरोपीने गेल्या पाच वर्षात सहा विविध ठिकाणी कार्यालये सुरु केली. या प्रकरणी तपास सुरु आहे. अतिरिक्त पोलीस महानिर्देशक, एटीएस आणि एसओजी, राजस्थान, जयपुर च्या लोकांना अपील केले आहे की, त्यांनी कोणत्याही अज्ञात व्यक्तीकडून करण्यात आलेल्या कोणत्याही प्रस्तावावर विश्वास ठेवू नका.