ऑक्टोंबर महिन्यापासून वाहन परवानामध्ये होणार 'हे' मोठे बदल, अधिक जाणून घ्या

तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे हे प्रत्येक वाहनचालकाला बंधनकारक असते.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

वाहन खरेदी करताना त्याच्यासंबंधित कागपत्रे असणे फार महत्वाचे असते. तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे हे प्रत्येक वाहनचालकाला बंधनकारक असते. मात्र सध्या वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक दुर्घटनासुद्धा घडल्याचे प्रकार समोर आले आहेत. मात्र वाहन परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र हे वाहनचालकाकडे असणे अत्यंत गरजेचे आहे.

तर येत्या ऑक्टोंबर महिन्यांपासून वाहन परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्रासंबंधितच्या नियमात बदल करण्यात येणार आहेत. त्यामुळे बदललेल्या नियमाअंतर्गत वाहन नोंदणी प्रमाणपत्र आणि वाहन परवाना एकाच प्रकारचे असणार आहे. त्याचसोबत दोन्ही कागदपत्रांवरील सर्व प्रकारची माहिती देखील सारखीच असणार आहे.(वाहतुकीचे नियम मोडल्यास चालकाला 10 हजार रुपयांचा दंड ठोठावणार)

नवीन परवाना धारकांना ते रिन्यू करण्यासाठी 15-20 रुपये मोजावे लागणार आहे. देशात दररोज 32 हजार नवीन वाहन परवान्यांची नोंद होत असते. तर काही राज्यात वाहन परवान्यावर वाहन संबंधित माहिती पुढे किंवा मागील बाजून छापलेली असल्याचे दिसून येते. मात्र आता वाहन प्रमाणपत्र आणि वाहन परवाना एकच असणार आहे. या वाहन परवान्यामध्ये ग्राहकाला एक मायक्रोचिप आणि क्यूआर कोड दिला जाणार आहे. त्यानुसार ग्राहकाला तुम्ही कोणता नियम मोडला किंवा तुमच्या गाडीवर किती रुपयांचा दंड भरायचा बाकी आहे हे कळणार आहे.