Tamil Nadu Explosion: तामिळनाडू मधील कुडालोर येथील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; 7 जणांचा मृत्यू तर 3 जण जखमी

या स्फोटात 7 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले आहेत. अशी माहिती कुडलोरचे पोलिस अधीक्षकांनी दिली आहे.

Explosion (Image used for representational purpose only) (Photo Credits: PTI)

तामिळनाडू (Tamil Nadu) मधील कुडालोर (Cuddalore) जिल्ह्यातील फटाक्यांच्या कारखान्यामध्ये (Firecrackers Factory) अचानक स्फोट झाला. या स्फोटात 7 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले आहेत. अशी माहिती कुडलोरचे पोलिस अधीक्षकांनी (Superintendent of Police) दिली आहे. हा फटाक्यांचा कारखाना कट्टुमन्नारकोइल येथे आहे. राजधानी चेन्नईपासून हा कारखाना तब्बल 190 किलोमीटर अंतरावर आहे, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

हा स्फोट इतका मोठा होता की कारखान्याचा वरील भागही कोसळला. यात कारखान्याच्या मालकाचाही मृत्यू झाला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान या घटनेच्या अधिक तपशीलाची प्रतिक्षा आहे. (Nagpur Sugar Factory Blast: नागपूर जवळच्या बेला येथील मानस ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्यात मोठा स्फोट; 5 कामगारांचा मृत्यू)

ANI Tweet:

गेल्या वर्षी पंजाब मधील बाटला येथील फटाक्यांच्या फॅक्टरीत झालेल्या स्फोटात तब्बल 21 जणांचा मृत्यू झाला होता. तर 16 जण जखमी झाले होते. या भयंकर स्फोटात इमारतीला आग लावून ती कोसळली होती. हा कारखाना नवी दिल्ली पासून सुमारे 460 किमी अंतरावर होता.