धक्कादायक! पोलिसाच्या कारची दोन मुलींना जोरात धडक; एकीचा जागीच मृत्यू, CCTV मध्ये कैद झाली अंगावर काटा आणणारी घटना (Watch Video)
या ठिकाणी सकाळी साडेआठच्या सुमारास रस्ता ओलांडताना धन्नोवाली येथे राहणाऱ्या दोन मुलींना कारने धडक दिली
जालंधर (Jalandhar) शहरातील रामा मंडी पोलीस स्टेशन परिसरातील जालंधर-फगवाडा महामार्गावरील (Jalandhar-Phagwara Highway) धन्नोवाली गावाजवळ सोमवारी सकाळी एक मोठा अपघात झाला. या ठिकाणी सकाळी साडेआठच्या सुमारास रस्ता ओलांडताना धन्नोवाली येथे राहणाऱ्या दोन मुलींना कारने धडक दिली. या अपघातात नवज्योत कौर नावाच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर तिची मैत्रीण गंभीर जखमी झाली. ही गाडी एक पोलीस निरीक्षक चालवत होता. दोघीही जालंधरमधील ऑटो शोरूममध्ये काम करत होत्या आणि आणि घरून कामावर जाण्यासाठी पायी महामार्ग ओलांडत होत्या.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, कार चालवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव अमृत पाल सिंह आहे आणि त्याला अटक करण्यात आली आहे. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, या दोन्ही मुली रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत आहेत, अशात एक वेगवान पांढऱ्या रंगाची गाडी त्यांच्या अंगावरून जाते. हा अपघात इतका मोठा होता की गाडीची धडक बसल्यावर यातील एक मुलगी चक्क हवेत उडाली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांनी जालंधर फगवाडा महामार्ग पूर्णपणे बंद केला आहे. माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतांच्या नातेवाईकांना समजावण्याचा प्रयत्न सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळापासून काही अंतरावर ब्रेझा कार ताब्यात घेतली. ही कार होशियारपूर क्रमांकाची आहे. ग्रामस्थांनी नाकाबंदी केल्यानंतर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामध्ये लष्कराची रुग्णवाहिकाही अडकली होती. (हेही वाचा: Bhopal Accident: भोपाळमध्ये देवीच्या मिरवणूकीवेळी कारची नागरिकांना धडक, दोन जण जखमी)
एडीसीपी 1 जालंधर सुहेल मीर यांनी सांगितले की, हे वाहन पोलीस निरीक्षक अमृत पाल सिंह चालवत होता, जो कारमध्ये एकटाच होता आणि त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, स्थानिक लोक आणि कुटुंबीयांशी बोलून पोलीस महामार्ग उघडण्याचा प्रयत्न करत आहेत.