Shocking! 25 वर्षीय तरुणाने आपल्या पाळीव कुत्र्याला मारून त्याचे रक्त प्यायले आणि नंतर मांसही खाल्ले

हा तरुण 3 वर्षापासून मानसिकदृष्ट्या आजारी आहे. त्याचे मानसिक उपचार ग्वाल्हेरमध्ये सुरू आहेत. आजूबाजूच्या लोकांचे म्हणणे आहे की तो तरुण वेडा आहे. गेल्या वर्षी या तरुणाने शेजारील एका तरुणाच्या डोक्यात काठीने वार करून त्याचे डोके फोडले होते

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- Unsplash)

मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) भिंड (Bhind) येथून एक धक्कादायक बाब समोर येत आहे. जिल्ह्यातील दबोह शहरातील प्रभाग 4 मध्ये राहणाऱ्या एका तरुणाने आपल्या पाळीव कुत्र्यावर (Dog) आधी चाकूने हल्ला केला, नंतर त्याचे रक्त भांड्यात भरले. यानंतर तो टेरेसवर गेला व तिथल्या खिडकीत बसून खालील लोकांना ते दाखवत आधी त्याने कुत्र्याचे रक्त प्यायले आणि नंतर कुत्र्याला खाऊ लागला. खालून हे दृश्य पाहणाऱ्या लोकांना धक्काच बसला व त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावर पोलिसांनी आपण काहीही करू शकत नसल्याचे सांगितले.

या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यानंतर वाद वाढत गेल्यावर तरुणाला पकडून ग्वाल्हेर मेंटल हेल्थकेअरमध्ये पाठवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे तीन दिवसांपूर्वी दाबोह शहरातील या 25 वर्षीय तरुणाची आई आणि लहान भाऊ लग्नाला गेले होते. हा तरुण घरात एकटाच असताना त्याने छतावर बांधलेल्या कुत्र्याला मारले आणि त्याचे रक्त पिऊ लागला.

इतकेच नाही तर त्याने कुत्र्याची कातडी आणि सांगाडा घराच्या खिडकीला लटकवला. रस्त्यावरून कोणीही जाऊ लागले की, हा तरुण कुत्र्याची कातडी आणि सांगाडा चाटायचा. या विकृत वागण्याने त्रस्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केल्यावर नातेवाइकांनी तरुणाला खोलीत कोंडून ठेवले. या तरुणाला मानसिक रुग्णालयात पाठवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

हा तरुण 3 वर्षापासून मानसिकदृष्ट्या आजारी आहे. त्याचे मानसिक उपचार ग्वाल्हेरमध्ये सुरू आहेत. आजूबाजूच्या लोकांचे म्हणणे आहे की तो तरुण वेडा आहे. गेल्या वर्षी या तरुणाने शेजारील एका तरुणाच्या डोक्यात काठीने वार करून त्याचे डोके फोडले होते. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. आता या तरुणाकडून कुत्रा चावून खाल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement