Shocking! नऊ वर्षांच्या मुलीवर बापाचे अमानुष अत्याचार; प्रायव्हेट पार्टला जखम, घालावे लागले टाके

ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस व चाइल्डलाइन टीमला माहिती दिली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: File Image)

राजस्थानमधील (Rajasthan) अलवरमध्ये (Alwar) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यात एका बापाने आपल्या नऊ वर्षांच्या मुलीवर अनेक दिवस अत्याचार केले आहेत. महत्वाचे म्हणजे घरच्यांनाही याची माहिती होती, मात्र त्यांनी ती गोष्ट दाबून ठेवली. वडिलांनी आपल्या मुलीवर इतक्या अमानुष पद्धतीने अत्याचार केले की, मुलीच्या प्रायव्हेट पार्टला जबर दुखापत झाली. जेव्हा आरोपी पित्याने 5 दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता, तेव्हा तिच्या प्रायव्हेट पार्टला दुखापत झाल्याने तिला खासगी रुग्णालयात नेण्यात आले.

मुलगी जेव्हा रुग्णालयात पोहोचली तेव्हा डॉक्टरांना तिच्या प्रायव्हेट पार्टसना टाके घालावे लागले. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस व चाइल्डलाइन टीमला माहिती दिली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आतापर्यंतच्या तपासात असे समोर आले आहे की, मुलीची प्रकृती बिघडल्यानंतर वडिलांनी तिला एका डॉक्टरकडे नेले होते, जिथे तिच्या प्रायव्हेट पार्टला टाके घालण्यात आले होते.

सध्या मुलगी चाइल्डलाइन टीमसोबत आहे, जिथे तिचे समुपदेशन केले जात आहे. वडिलांद्वारे अत्याचार झालेली मुलगी चौथीत शिकत असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तिचे वडील तिला त्रास देत होते. तिच्यासोबत घडलेल्या गोष्टींबद्दल ती चाइल्डलाइन टीमला काही सांगू शकली नाही, कारण तिला आपल्यासोबत काय घडत आहे हेच लक्षात येत नव्हते. तिने अनेक गोष्टी हावभावातून सांगितल्या. (हेही वाचा: Suicide: घटस्फोटाची कायदेशीर नोटीस मिळाल्याने नैराश्यातून पत्नीची आत्महत्या, पती अटकेत)

मुलीचे वडील मजुरीचे काम करतात. सध्या ते फरार आहेत. पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत आणि 376 आयपीसीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. भैरव डीएसपी आनंदराव यांच्याकडे तपास सोपवण्यात आला आहे. पीडित अल्पवयीन मुलीचे मेडिकल करण्यात आले असून आरोपी वडिलांचा शोध सुरू आहे.