धक्कादायक! जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून 80 वर्षांच्या वृद्धाला जिवंत गाढले; हत्येच्या आरोपाखाली 8 जणांना अटक, Meghalaya राज्यातील घटना

आता पुरलेल्या व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे.

Arrest. Representational Image. (Photo Credit: ANI)

मेघालयातील (Meghalaya) वेस्ट गारो हिल्स जिल्ह्यात, जादूटोणा (Witchcraft) करत असल्याच्या संशयावरुन एका 80 वर्षीय वृद्धाला त्याच्या नातेवाईकांनी जिवंत पुरल्याची घटना घडली आहे. आता पुरलेल्या व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. मंगळवारी पोलिसांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, मॉरिस मर्नगर (Moris Marngar) नावाच्या व्यक्तीच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे. 7 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली आहे. सोमवारी पाच फूट खोल खड्ड्यामधून मृतदेह बाहेर काढण्यात आला त्यावेळी मृतदेहाचे शरीर आणि हात बांधलेले होते आणि चेहरा झाकलेला होता.

7 ऑक्टोबरला मॉरिस मार्नगर यांना त्यांच्या नातेवाईकांनी वेस्ट खासी हिल्समधील गावातून जबरदस्तीने घराबाहेर नेले आणि त्याच्या एका दिवसानंतर त्यांच्या मुलांनी गावातील काही लोकांना याबाबत सांगितले व पुढे गावातील प्रमुखाने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून, रविवारी तीन मुख्य आरोपी डॅनिएल्स, जेल्स आणि डिफरवेल यांना अटक केली. मृताच्या काही नातेवाईकांनी पत्रकारांना सांगितले की, मर्नगर कुटुंबातील सदस्यांवर जादू-टोणा करत असे.

Mawliehbah Mawnar गावच्या परिषदेने या हत्येचा निषेध केला आहे. कौन्सिलचे सदस्य बी.एस. नोंगफूड म्हणाले की, ‘मॉरिससारख्या खेड्यातील ज्येष्ठ रहिवाशाच्या निधनामुळे हे गाव अतिशय दुःखी आहे. पोलिस उपाध्यक्ष बी. खरझाना म्हणाले की प्राथमिक तपासात कुटुंबातील 18 सदस्यांचा खूनप्रकरणी सहभाग असल्याचे आढळले आहे. एएनआयशी बोलताना गृहमंत्री लखमेन रेनबुई म्हणाले, ‘अशी घटना घडल्याचा फार खेद आहे. घडत असलेल्या सर्व गुन्ह्यांची कायदा नक्कीच दखल घेईल.’ (हेही वाचा: Tamil Nadu: 74 वर्षीय वृद्धाला फ्रीझरमध्ये बंद करून मृत्यूची वाट पाहत होते नातेवाईक; गुन्हा दाखल)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, Mawliehbah Mawnar गावाच्या प्रमुखाने दिलेल्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल करण्यात आला. यामध्ये म्हटले आहे की, मॉरिसला काही महत्त्वाच्या कामाच्या बहाण्याने काही लोक बाहेर घेऊन गेले, यामध्ये त्याच्या 4 पुतण्यांचा समावेश होता. मात्र, त्यानंतर ते घरी परतले नसल्याने त्यांचे अपहरण झाले असल्याच्या संशयाने त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेतली.