Shocking! नैराश्येने ग्रस्त असलेल्या रुग्णाच्या हातून घडले धक्कादायक कृत्य; लहान मुलांसह 5 जणांची केली हत्या, पोलिसांकडून अटक

प्रदीपच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे.

Murder | (Photo Credits: PixaBay)

त्रिपुराच्या (Tripura) खोवाई (Khowai) जिल्ह्यात शनिवारी एक धक्कादायक घटना समोर आली. या ठिकाणी एका मानसिक रुग्णाने केलेल्या हल्ल्यात एका पोलीस निरीक्षकासह पाच जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अतिरिक्त पोलिस अधीक्षक (एएसपी) राजीव सेनगुप्ता यांनी सांगितले की, प्रदीप देबरॉय नावाच्या व्यक्तीने शेरतली गावात त्याच्या दोन किशोरवयीन मुली आणि लहान भावावर अचानक हल्ला केला. या ठिकाणी त्या जागीच ठार झाल्या. त्यानंतर तो घराबाहेर पडला आणि त्याने परिसरातील लोकांवर हल्ला करण्यास सुरुवात केली.

त्यावेळी त्याने रिक्षात बसलेल्या दोघांवर हल्ला केला. तोपर्यंत मोठ्या संख्येने पोलीस तेथे पोहोचले होते. अशा स्थितीत खोवई पोलीस ठाण्याचे द्वितीय निरीक्षक सत्यजित मलिक यांनी आरोपी प्रदीप देव राय याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने मलिक यांना गंभीर जखमी केले. पुढे त्यांचाही मृत्यू झाला. यानंतर कसे तरी पोलिसांनी देव रायला पकडले आणि त्याला पोलीस ठाण्यात आणले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप देव राय गेल्या अनेक दिवसांपासून नैराश्याने होता आणि त्याने सर्वांशी बोलणे बंद केले होते. काल मध्यरात्री अचानक झोपेतून उठून त्याने घरात ठेवलेली कुऱ्हाड घेऊन आधी आपल्या दोन मुलांना मारायला सुरुवात केली. यादरम्यान त्याने त्याच्या पत्नीलाही मारहाण केली. या हल्ल्यात मुलींचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. त्यानंतर घराबाहेर पडून त्याने इतर लोकांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. लोक इतके घाबरले होते की काही वेळ कोणीही घराबाहेर पडले नाही. (हेही वाचा: कर्नाटकमध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशयातून पतीची पत्नी आणि तरुणाला झाडाला बांधून अमानुष मारहाण, एकास अटक)

आरोपीच्या पत्नीला गंभीर अवस्थेत खोवई जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रदीपच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून प्रदीपच्या या रक्तरंजित हिंसक वर्तनामागील कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.