Noida Shocker: नोएडातील सेक्टर 73 मध्ये एका नैराश्याने (Depression) ग्रस्त महिलेने इमारतीच्या छतावरून उडी मारून आत्महत्या (Suicide)केल्याची घटना घडली. जवळच असलेल्या लोकांनी या घटनेचा व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला. (Palghar Shocker: इअरफोन लावून रेल्वे रुळ ओलांडने बेतले जीवावर; कोचुवेली-अमृतसर एक्सप्रेसच्या धडकेत तरूणीचा मृत्यू)
महिलेने छतावरून उडी मारली
उत्तर प्रदेशमधील नोएडा सेक्टर 73 मध्ये एका महिलेने इमारतीच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली. जवळ उभ्या असलेल्या लोकांनी ही घटना त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली. व्हिडिओमध्ये लोक महिलेला उडी मारण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत, परंतु महिलेने कोणाचेही ऐकले नाही आणि छतावरून उडी मारली. या घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच सेक्टर 113 पोलीस ठाणे घटनास्थळी पोहोचले. मृत महिलेचे नाव पूजा असे आहे, ती 32 वर्षांची होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला.
नैराश्यातून उचलले पाऊल
32 साल की पूजा ने #नोएडा के सेक्टर 73 में स्थित बिल्डिंग की छठी मंजिल से कूदकर आत्महत्या कर ली…
पूजा की ढाई साल पहले शादी हुई थी, पति इंजीनियर है pic.twitter.com/ZB5CAbtNQP
— Mamta Tripathi (@MamtaTripathi80) January 24, 2025
मिळालेल्या माहितीनुसार, मृत पूजा ही नैराश्याने ग्रस्त होती आणि तिच्यावर उपचार सुरू होते. तिचा नवरा व्यवसायाने इंजिनिअर आहे. घटनेच्या वेळी पूजा बराच वेळ इमारतीच्या छतावर बसून होती. खाली उभे असलेले लोक तिला उडी मारणे थांबवण्यास सांगत राहिले, असे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. पण पूजाने कोणाचेही ऐकले नाही आणि उडी मारली.
गुन्हा दाखल करून तपास सुरू
मृत महिलेच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गुरुवारीही एका तरुणीने त्याच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. ती नैराश्याची बळी असल्याचे सांगण्यात आले. सध्या, पोलिस दोन्ही घटनांना जोडण्यासाठी आणि संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी तपासात करत आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.