Nagpur Couple Suicide Case: नागपूर मध्ये दाम्पत्याची लग्नाच्या वाढदिवसा दिवशी 'वेडिंग ड्रेस' मध्ये आत्महत्या; अंत्यविधीसाठी 75 हजार ठेवले बाजूला

टोनी आणि अ‍ॅनी नैराश्यात असल्याने मागील काही महिन्यांपासून ते आत्महत्येचा विचार करत होते. त्यांची समजूत काढण्याचा नातेवाईकांनी प्रयत्न केला होता पण त्यांनी सारी पूर्ण विचार करून आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने सारेच हळहळले आहेत.

Nagpur Couple Suicide Case: नागपूर मध्ये दाम्पत्याची लग्नाच्या वाढदिवसा दिवशी 'वेडिंग ड्रेस' मध्ये आत्महत्या; अंत्यविधीसाठी 75 हजार ठेवले बाजूला
Couple | Pixabay.com

नागपूर (Nagpur) मध्ये लग्नाच्या वाढदिवसा दिवशी वेडिंग ड्रेस परिधान करत पती-पत्नीने आत्महत्या (Suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांनी व्हॉट्सअ‍ॅप वर परिवारासाठी खास मेसेज देखील ठेवला होता. दरम्यान त्यांच्या घरात सापडली असून परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं आणि आपल्या आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार धरू नये असे म्हटलं आहे. टोनी आणि ॲनी जारील मॉनक्रिप असे या जोडप्याचे नाव असून ते जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्टीननगरात राहत होते.

नैराश्यातून आत्महत्येचा निर्णय

टोनी आणि ॲनी जारील मॉनक्रिप हे मागील काही महिन्यांपासून नैराश्यात होते. मिईडीया रिपोर्ट्सनुसार, कोविड संकटात टोनी यांची नोकरी गेली होती. ते नैराश्यामध्ये होते. त्यामधून आर्थिक तंगी होती. प्रेमविवाह केलेल्या या जोडप्याला मूल ही होत नसल्याने त्यांच्या आयुष्यात उदासी होती. परिणामी ख्रिसमस नंतर दोघांनीही लग्नाच्या वाढदिवसाला आत्महत्या करत जगाचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सुसाईड नोट मध्ये अंत्यविधीसाठी घरात 75 हजार रुपये ठेवले असल्याचे नमूद केले होते. नक्की वाचा: Double ‘Suicide Pod’ मध्ये 46 वर्ष संसार केलेलं ब्रिटीश जोडपं एकत्र कवटाळणार मृत्यूला; पत्नीला Dementia चं निदान झाल्याने घेतला निर्णय .

शेजार्‍यांनी दिली आत्महत्येची माहिती

टोनी आणि अ‍ॅनी यांनी आत्महत्येपूर्वी कुटूंबियांशी फोनवर गप्पा मारल्या होत्या. तेव्हा त्यांनी सारं सुरळीत असल्याचं दाखवलं. मात्र काही तासांतच त्यांनी दोरीने गळफास घेत आयुष्य संपवलं. सकाळी 10 वाजले तरीही कुणी बाहेर आले नाही हे पाहून शेजार्‍यांनी दरवाजा ठोठावला पण आतून कोणताच प्रतिसाद आला नाही. खिडकीतून पाहिल्यानंतर दोघांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसले. शेजार्‍यांनी पोलिसांना याची माहिती दिली.

टोनी आणि अ‍ॅनी नैराश्यात असल्याने मागील काही महिन्यांपासून ते आत्महत्येचा विचार करत होते. त्यांची समजूत काढण्याचा नातेवाईकांनी प्रयत्न केला होता  पण त्यांनी सारी पूर्ण विचार करून आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने सारेच हळहळले आहेत.

Suicide Prevention and Mental Health Helpline Numbers: Tele Manas (Ministry of Health) – 14416 or 1800 891 4416; NIMHANS – + 91 80 26995000 /5100 /5200 /5300 /5400; Peak Mind – 080-456 87786; Vandrevala Foundation – 9999 666 555; Arpita Suicide Prevention Helpline – 080-23655557; iCALL – 022-25521111 and 9152987821; COOJ Mental Health Foundation (COOJ) – 0832-2252525.

(The above story first appeared on LatestLY on Jan 07, 2025 09:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).