अयोद्धा: राम मंदिर निर्मितीच्या खोदाकामामध्ये प्राचीन मुर्त्या, शिवलिंग सापडल्याचा दावा; पहा सुब्रमण्यम स्वामींची प्रतिक्रिया
दरम्यान त्यासाठी सुरू केलेल्या खोदाकामामध्ये जुन्या मूर्त्या, ऐतिहासिक खांब सापडले आहेत. यामध्ये 5 फूटाचं शिवलिंगदेखील सापडल्याचा दावा राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे जनरल सेक्रेटरी चंपक राय (Champak Rai)यांनी मीडीयाशी बोलताना केला आहे.
अयोद्धेमध्ये राम मंदिर उभारणीच्या कामाला सुरूवात झाली आहे. दरम्यान त्यासाठी सुरू केलेल्या खोदाकामामध्ये जुन्या मूर्त्या, ऐतिहासिक खांब सापडले आहेत. यामध्ये 5 फूटाचं शिवलिंगदेखील सापडल्याचा दावा राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे जनरल सेक्रेटरी चंपक राय (Champak Rai)यांनी मीडीयाशी बोलताना केला आहे. मागील काही दिवसांपासून अयोद्धा मंदिराच्या कामाला लॉकडाऊन दरम्यान सरकारने सुरूवात केली आहे. भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy)यांनी ही गोष्ट आश्चर्यकारक नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर राम मंदिर निर्माण कारु सुरक्षित हातांमध्ये आहे. यापूर्वी देखील असेच अवशेष मिळाले होते. असे राम माधव म्हणाले आहेत.
'2002-2005 मध्ये पुरात्त्त्व विभागालाही काही अवशेष मिळाले होते मात्र त्यांनी पुरेसे खोदकाम केलेले नाही. अलाहाबाद कोर्टाला दिलेल्या माहितीमध्येही त्यांनी मंदिराचे अवशेष असल्याचं म्हटलं आहे. ' अशी प्रतिक्रिया स्वामींनी वृत्त वाहिनीला दिली आहे. मागील वर्षी सुप्रिम कोर्टाने देखील मंदिराचे अवशेष असू शकतात असा दावा केला आहे. दरम्यान अंतिम फैसल्यामध्ये सुन्नी वफ्फ बोर्डाला मशिद उभरणीसाठी 5 एकर जागा दिली आहे.
राम माधव यांची प्रतिक्रिया
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर मंदिर उभारणीसाठी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ही ट्र्स्ट निर्माण करून त्यांच्याकडे राम मंदिराच्या निर्मितीचं काम सोपावण्यात आलं आहे.