शिवाजी महाराजांचा पुतळा छिंदवाडा येथे पुन्हा सन्मानाने बसवणार; मध्य प्रदेश सरकारने प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही दिले
तर, मध्य प्रदेशातील विरोधी पक्ष तसेच, महाराष्ट्र भाजपनेही तीव्र नाराजी व्यक्त केली होती. केवळ विरोधी पक्षच नव्हे तर, या प्रकरणावर सर्वपक्षीय नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा पुतळा मध्यप्रदेशातील छिंदवाडा (Chhindwara) येथे पुन्हा सन्मानाने बसवला जाणार आहे. तसेच, ज्या पद्धतीने हा पुतळा हटविण्यात आला त्याबाबत चौकशी करण्याचे आदेशही राज्य सरकारने दिले आहेत. छत्रपतींचा पुतळा बुलडोझरने हटविण्यात आला होता. हा पुतळा हटवतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. त्यानंतर शिवरायांचा अवमान झाला असून, हा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवप्रेमींकडून करण्यात आली होती. या घटनेनंतर छिंदवाडा, महाराष्ट्र आणि भारतातील विविध ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येत होता. छिंदवाडा येथे तर कडकडीत बंद बाळून या प्रकरणाचा निशेध करण्यात येत होता.
या प्रकरणाची दखल घेऊन मध्य प्रदेश सरकारने तातडीने चौकशीचे आदेश दिले असून, ज्या ठिकाणाहून पुतळा हटवला त्याच ठिकाणी हा पुतळा पुन्हा उभारण्याचे आदेश दिले आहेत. लोकसत्ता डॉट कॉमने याबाबत वृत्त दिले आहे.दरम्यान, महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनीही मध्य प्रदेशात असलेल्या काँग्रेस सरकारकडे या प्रकरणी तक्रार केली होती. तर, मध्य प्रदेशातील विरोधी पक्ष तसेच, महाराष्ट्र भाजपनेही तीव्र नाराजी व्यक्त केली होती. केवळ विरोधी पक्षच नव्हे तर, या प्रकरणावर सर्वपक्षीय नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
दरम्यान, सर्व तक्रारींचा आणि एकूण प्रकरणाचे गांभीर्य विचारात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश सरकारने दिले आहेत. तसेच हा पुतळा पुन्हा बसवण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. (हेही वाचा, मध्य प्रदेश: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याप्रकरणी आक्रमक आंदोलनानंतर नगरपालिकेकडून सांमजस्याची भूमिका; लवकरच मोहगावात बसवणार नवा पुतळा)
शिवराज सिंह चौहान ट्विट
दरम्यान, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान या यांनीही या प्रकरणावर नाराजी व्यक्त करत टीका केली होती. शिवराज सिंह चौहान या यांनी ट्विटरद्वारे म्हटले होते की, 'छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्राचा गौरव आहेत. आमचे आराध्य दैवत असून, प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांचा अपमान आम्ही कोणत्याही स्थितीत सहन करणार नाही. जर त्यांच्या पुतळ्याबाबत काही अडचण होती. तर, त्यांचा पुतळा सन्मानानेही बाजूला करता आला असता. मात्र, हे सरकार महापुरुषांचा अपमान करते आणि त्यावरही गर्व व्यक्त करते', अशी टीका शिवराजसिंह चौहाण यांनी व्यक्त केली आहे.