टीव्ही डिबेट मध्ये उद्धटपणा! Shazia Ilmi यांनी ठोकला पत्रकार Rajdeep Sardesai विरूद्ध मानहानीचा दावा; दिल्ली उच्च न्यायालयाने माहितला संपूर्ण व्हिडीओ

शाझिया इल्मी आणि राजदीप सरदेसाई यांच्यातील हा संघर्ष मीडीया कडून प्रसारित केलेला मजकूर अचूक आणि न्याय्य पद्धतीने मांडला जात आहे का? असा प्रश्न निर्माण करणारा आहे.

Shazia Ilmi-Rajdeep Sardesai | X

भाजपा नेत्या शाजिया इल्मी (Shazia Ilmi) यांनी ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई (Rajdeep Sardesai) यांच्या विरूद्ध मानहानीचा दावा (Defamation Suit ) ठोकला आहे. इल्मी यांच्यावर 'इंडिया टुडे' (India Today news channel) च्या एका व्हिडिओ पत्रकारासोबत गैर वर्तन केल्याच्या आरोपाखाली हे प्रकरण आहे. यामध्ये इल्मी यांनी कोर्टात त्यांच्याविरूद्ध केलेल्या आरोपा विरूद्ध धाव घेतली आहे. इल्मी यांनी राजदीप सरदेसाई यांच्यावर मानहानीचा दावा ठोकला आहे.

राजदीप सरदेसाई- शाजिया इल्मी नेमकं प्रकरण काय?

26 जुलैचं हे प्रकरण आहे. लाईव्ह टीव्ही डिबेट दरम्यानचा हा प्रकार आहे. यामध्ये राजदीप सरदेसाई यांनी 'कारगिल विजय दिवस',' अग्नीवीर योजना' आणि सुरक्षा दलांबाबत घडणार्‍या राजकारणावर एक डिबेट आयोजित केले होते. या डिबेट नंतर सरदेसाई यांनी एक व्हिडिओ अपलोड केला यामध्ये इल्मी यांच्यावर गैर वर्तणूकीचा आरोप लावला आहे. इल्मी यांनी हा व्हिडिओ चूकीच्या प्रकारे सादर केल्याचं म्हटलं आहे. यावरून सोशल मीडीयात अनेकांनी टीका देखील केली आहे. इल्मींना यावरून ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मनीत प्रीतम सिंह अरोडा यांनी या प्रकरणामध्ये सुनावणी केली आहे. कोर्टाने राजदीप सरदेसाई आणि 'इंडिया टुडे' च्या वकीलांना घटनेचा पूर्ण व्हिडीओ सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील सुनावणी 13 ऑगस्टला होणार आहे.

इल्मी कडून वकील नताशा गर्ग यांनी कोर्टात दिलेल्या माहितीमध्ये व्हिडिओ आताही ऑनलाईन आहे आणि लोकं इल्मी यांच्याविरूद्ध अभद्र भाषेत टीपण्णी करत आहेत. त्यांनी हा व्हिडीओ प्रायव्हेट करण्याचा आदेश दिला आहे. प्रकरणाची सुनावणी होईपर्यंत व्हिडीओ लोकांपासून दूर राहिल. मात्र कोर्टाने त्याला नकारलं आहे.

बदनामीच्या या प्रकरणामुळे मीडीया राजकारण आणि न्यायव्यवस्था यांच्यातील संबंधांवर नव्या वादाला तोंड फुटले आहे. शाझिया इल्मी आणि राजदीप सरदेसाई यांच्यातील हा संघर्ष मीडीया कडून प्रसारित केलेला मजकूर अचूक आणि न्याय्य पद्धतीने मांडला जात आहे का? असा प्रश्न निर्माण करणारा आहे. या खटल्याचा अंतिम निकाल काय लागतो हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण या प्रकरणाचा भारतीय मीडिया आणि राजकारणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो.