सोनिया गांधी यांच्या निवृत्तीनंतर शरद पवार होणार नवे UPA अध्यक्ष? प्रसारमाध्यमांमधून समोर येणाऱ्या वृत्तांचा NCP कडून खुलासा
सोनिया गांधी लवकरच पदावरुन निवृत्त होणार असून त्यांच्या जागी शरद पवार यांची नियुक्ती होण्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
महाराष्ट्रातील कसलेले राजकारणी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची UPA च्या अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता असल्याचे बोलले जात होते. सोनिया गांधी (Sonia Gandhi) लवकरच पदावरुन निवृत्त होणार असून त्यांच्या जागी शरद पवार यांची नियुक्ती होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून सोनिया गांधी यांच्या निवृत्तीच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे सोनिया गांधी निवृत्त झाल्यास UPA अध्यक्षपदासाठी शरद पवार हे अगदी योग्य असतील. मात्र प्रसारमाध्यमांतून समोर येणाऱ्या या बातम्या चुकीच्या असल्याचे स्पष्टीकरण NCP कडून देण्यात आले आहे. (Farmers Protest: कृषी कायदा रद्द होणार नाही; चंद्रकांत पाटील यांचे शरद पवार यांना थेट उत्तर)
"राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी UPA अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्याबद्दलचे वृत्त प्रसारमाध्यमांतून समोर येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हे स्पष्टीकरण देऊ इच्छितो की यूपीएच्या भागीदारांमध्ये अशा कोणत्याही प्रस्तावाबाबत चर्चा झालेली नाही," असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख स्पॉक्स महेश तापसे यांनी सांगितले आहे.
ANI Tweet:
लोकसभा निवडणूक 2019 मधील पराभवानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देत सोनिया गांधी यांच्यात हातात सर्व सुत्रं दिली. दरम्यान, राहुल गांधी यांनी अध्यक्षपदापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर सोनिया गांधी यांच्या निवृत्तीनंतर लवकरच पक्षला नवा अध्यक्ष हवा असेल, यात शंका नाही. मात्र नव्या अध्यक्षच्या निवडीसाठी पुढील वर्षी निवडणूका घेण्यात येतील.
मागील वेळेस सोनिया गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले होते. मात्र त्या UPA चेअरमन आणि पक्षाच्या नेत्या म्हणून कामकाज पाहत होत्या. आता त्यांची निवृत्ती होणार असल्याने त्या UPA चेअरमन पदही सोडणार असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांची जागा घेण्यासाठी सुयोग्य उमेदवार कोण? तर त्यासाठी अनुभवी, चतुर राजकारणी असणे आणि इतर पक्षांची बोलणी करण्यास समर्थ असणाऱ्या अध्यक्षांची गरज आहे. तसंच काँग्रेस पक्ष सध्या दुर्बल परिस्थितीत आहे. परिणामी UPA अध्यक्षपदाची सुत्रं योग्य व्यक्तीच्या हाती जागे अत्यंत महत्त्वाचे आहे.
दरम्यान, या सगळ्यात शरद पवार यांचे अध्यक्षपदासाठी नाव चर्चेत आहे, अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र NCP कडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणानंतर अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.