Sexually Assaulting On Stray Dog: कर्नाटकमध्ये भटक्या कुत्र्यावर लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक
पोलिस सध्या आरोपीची चौकशी करत आहेत. अद्याप आरोपीविरोधात कोणतीही औपचारिक तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
Sexually Assaulting On Stray Dog: कर्नाटकच्या रामनगरा जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी चन्नापटना शहरातील सथानूर रोडजवळ एका व्यक्तीला भटक्या कुत्र्यावर (Stray Dog) लैंगिक अत्याचार (Sexually Assaulting) करताना पकडण्यात आले. या कृत्याने हैराण झालेल्या स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करत आरोपीला पकडून बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले.
बसवा असं या आरोपीचं नाव आहे. पोलिस सध्या आरोपीची चौकशी करत आहेत. अद्याप आरोपीविरोधात कोणतीही औपचारिक तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. प्राणी हक्क कार्यकर्ते आणि जनतेच्या वाढत्या संतापाच्या दरम्यान, अधिकारी आरोपींविरुद्ध स्वत:हून गुन्हा दाखल करण्याचा विचार करत आहेत. (हेही वाचा -Man Beat To Stray Dogs: भटक्या कुत्र्यांना बेदम मारहाण, तरुणावर गुन्हा दाखल, उत्तर प्रदेशातील घटना)
सुरतमध्ये कुत्र्याला मारहाण करून लैंगिक अत्याचार -
दरम्यान, काही दिवसांपूर्वी गुजरातमधील सुरत येथे कुत्र्याला मारहाण करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी उत्रण पोलिसांनी एका 37 वर्षीय व्यक्तीला अटक केली होती. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आयपीसीच्या कलम 377 आणि प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार आरोपीविरोधात तक्रार नोंदवली होती. (हेही वाचा -Pune Dog Attack Video: रस्त्यावर खेळत असताना भटक्या कुत्र्यांचा चिमुकल्या बाळावर हल्ला, थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल)
तथापी, आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्याने गुन्हा करण्यापूर्वी पॉर्न व्हिडिओ पाहिला होता. 6 डिसेंबर रोजी पहाटे 1 ते 3 च्या दरम्यान मोटा वराछा परिसरातील अंबिका पिनॅकल कॉम्प्लेक्सजवळ त्याने कुत्र्याचे लैंगिक शोषण केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पॉर्न व्हिडिओ पाहिल्यानंतर आरोपीने अशी विकृत कृती केली.